Pune Land Scam Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Land Scam: मोठी बातमी! पुण्यात आणखी एक मोठा घोटाळा, ७५० कोटींची जमीन ३३ कोटींना विकली

Pimpari-Chinchwad: पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाची शासकीय जमीन विकली. ७५० कोटींची जमीन ३३ कोटींना विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यात आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे

  • ७५० कोटींच्या सरकारी जमिनीची विक्री फक्त ३३ कोटींना करण्यात आली.

  • ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची १५ एकर जमीन परस्पर विक्री

  • हवेलीचे सहायक दुय्यम निबंधक विद्या शंकर बडे निलंबित

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पुण्यामध्ये आणखी एक मोठा जमीन घोटाळा प्रकरण समोर आले आहे. मुंढवा आणि बोपोडीपाठोपाठ पुन्हा एकदा शासकीय जमीन विक्रीचा घोटाळा उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाची सर्वे नंबर २० येथील १५ एकर जागेची परस्पर विक्री कोट्यावधी रुपयांत करण्यात आली आहे. जवळपास ७५० कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या या शासकीय जमिनीची विक्री फक्त ३३ कोटी रुपयांत करण्यात आला. या शासकीय जमीन विक्री घोटाळा प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने जानेवारी २०२५ मध्ये या जागेची विक्री परस्पर केली आहे. पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून य जागेची विक्री करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडून याबाबतची माहिती जेव्हा पशुसंवर्धन विभागाला कळविण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी या विषयाची तक्रार पुण्याचे विभागीय आयुक्ताकडे केली आहे. आता या प्रकरणात पुण्याचे विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाकडून चौकशी सुरू आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील कोट्यावधी रुपयाची शासकीय मोक्याची जागा या निमित्ताने लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यात पशुसंवर्धन विभागाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी हवेलीच्या सहायक दुय्यम निबंधक विद्या शंकर बडे यांना निलंबित करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील तासवडे येथील पशुसंवर्धन विभागाची कोट्यवधी रुपयांची जमीन परस्पर विकल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पशुसंवर्धन विभाग जमीन विक्री व्यवहारातील मुख्य मयत व्यक्ती हेरंब पंढरीनाथ गुपचूप यांचा मृत्यू १९८२ मध्ये झाला आहे. त्याच्या जवळपास २२ वारसदारांनी एकत्र येत ही जमीन कपिल छोटम फकीर आणि सय्यद फैयाज मीर अजिमोद्दीन यांना ३३ कोटी रुपयांत जानेवारी २०२५ मध्ये विकली आहे.

ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाची १५ एकर शासकीय जमीन हेरंब पंढरीनाथ गुपचूप यांच्या वारसदारांनी ३३ कोटी रुपयांना कपिल छोटम फकीर आणि सय्यद फैयाज मीर अजिमोद्दीन या व्यक्तींना विकली. पशुसंवर्धन विभागाची कोणतीही एनओसी न घेता पशुसंवर्धन विभागाची १५ एकर शासकीय जमीन हेरंब गुपचूप यांच्या वारसदारांनी विकली. पशुसंवर्धन विभागाच्या परवानगीशिवाय या जागेची विक्री करण्यात येऊ नये असा शेरा असताना देखील हेरंब गुपचूप याच्या कुटुंबीयांनी ही जमीन विकली अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे ताथवडे येथील फार्म मॅनेजर अमोल आहेर यांनी दिली आहे. आता या प्रकरणात संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचं मंत्री संजय सावकारे यांचा कार्यालयाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

SCROLL FOR NEXT