Pune Land Scam: पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया|VIDEO

Sharad Pawar Comment On Parth Pawar Land Deal Controversy: पुणे जमीन घोटाळा प्रकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अकोल्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर चौकशी व्हावी अशी मागणी केली.

अक्षय गवळी, साम टीव्ही

मनसेसोबत युती करणार का, या प्रश्नावर शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवलाये. आज शरद पवार हे अकोल्यात आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी पुणे जमीन घोटाळा आणि पार्थ पवार यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिलीये. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातही त्यांनी भाष्य केलंय. महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला सोबत घेणार का? यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी सांगितलं की, आघाडीतील नेत्यांनी यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा. काँग्रेसने लगेच टोकाची भूमिका घेऊ नये. मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आला होता.

दरम्यान, पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन व्यवहार प्रकरणी शरद पवार यांनी चौकशी व्हावी, अशी मागणी केली. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नोंदवला नाही असंही शरद पवारांना विचारण्यात आलं यावर शरद पवार म्हणाले की, पार्थवर गुन्हा का नोंद नाही? याबाबत गृहमंत्री फडणवीस योग्य माहिती सांगू शकतील अर्थातच ते बोलू शकतील. त्यांनी चौकशी करून वास्तव समोर आणावं, असं ते म्हणाले.

सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार चुकीचे नसल्याचं मत मांडलं होतं, यावर बोलतांना ते म्हटले. सुप्रिया सुळे यांचं ते मत वैयक्तिक आहे. पक्षाची अधिकृत भूमिका हीच आहे की, या प्रकरणाची चौकशी होऊन वास्तव समोर यायला हवं. कुटुंब वेगळं आणि राजकारणं वेगळं आहे. आमच्या कुटुंबातही एकमेकांविरोधात निवडणुका लढल्या जातात. मात्र, कुटुंबाची विचारधारा एकच आहे असंही पवारांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com