Pune Land Scam: मोठी बातमी! पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा, तहसीलदारांसह ९ जणांविरोधात गुन्हा

Pune Police: पुण्यामध्ये आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तहसीलदारासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांचा देखील समावेश आहे. या दोघांविरोधात हा दुसरा गुन्हा आहे.
Pune Land Scam: मोठी बातमी! पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा, तहसीलदारांसह ९ जणांविरोधात गुन्हा
Pune Land ScamSaam Tv
Published On

Summary -

  • पुण्यात मोठा जमीन घोटाळा उघडकीस

  • तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

  • कृषी विभागाची जमीन बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्याचा आरोप

  • खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

अक्षय बडवे, पुणे

पुणे शहरात आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनीबाबत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याप्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह शितल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडक पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदार सूर्यकांत येवले, कुलमुखत्यारधारक हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या सर्व ९ जणांविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होत. १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ पर्यंत हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चा महानगरपालिका क्षेत्रात लागू नसतानाही बोपोडी येथील चे ९ हेक्टर ही जमीन सन १८८३ पासून अॅग्रीकल्चर डिपार्टमेंट खात्याकडे म्हणजेच शासनाच्या ताब्यात व वहिवाटीत असतानाही, तसेच सदर जमीनीचे मालक व कब्जेदार सदरी अॅग्रीकल्चर डिपार्टमेंट यांचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केलेले असतांनाही, सदर जमीनीचा अपहार केला

या जमीनीवर व्हिजन प्रॉपर्टी तर्फे अर्जदार हेमंत गवंडे, राजेंद्र रामचंद्र विध्वंस, रुषीकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विदयानंद अविनाश पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शितल किसनचंद तेजवाणी, दिग्विजय अमरसिंह पाटील संचालक मेसर्स अमेडिया एंटरप्रायझेस् एलएलपीचेशी हातमिळवणी व संगनमत करुन सरकारी मिळकतींवर या लोकांच्या मालकी हक्क दिसून आला. बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करुन अशाप्रकारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com