Pune Land Scam Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Land Scam: १८०० कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, ३ जणांविरोधात गुन्हा

Major Action in Pune Land Fraud: पुण्यातून तब्बल १८०० कोटींचा जमीन घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे देखील नाव आहे. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Priya More

Summary -

  • १८०० कोटींच्या पुणे जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई

  • ३ आरोपींविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • आरोपींमध्ये शितल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांचा समावेश

  • अमेडिया कंपनीवर व्यवहारातील अनियमिततेचा आरोप

अक्षय बडवे, पुणे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार कथित जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या जमीन व्यवहार प्रकरणात शितल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू या तिघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बावधन पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस सध्या तपास करत आहेत. नोंदणी उपमहानिरीक्षकांचे पत्रातून माहिती समोर आली आहे. पण या पत्रात पार्थ पवार यांचे नाव नाही. त्यामुळे याप्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट? दिली की काय अशी चर्चा सुरू आहे.

पुण्यातील मुंढवा भागातील ४० एकर जमिनीच्या खरेदीचा दस्त केल्याने पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जमिनीची विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचा भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिग्विजय पाटील हे सध्या पुण्यातील गोखलेनगर भागात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिस नेमकी त्यांची चौकशी करून पुढील कार्यवाही करणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. गुन्हा दाखल झालेल्या तिघांवर पोलिस नेमकी काय कारवाई करणार आहेत ते पाहणं महत्वाचे ठरेल.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप केला आहे. पार्थ पवारांच्या अमीडिया कंपनीने १८०४ कोटींची जमीन फक्त ३०० कोटींना विकत घेतल्याचा गंभीर आरोप आहे. या आरोपानंतर आता राजकारण तापले आहे. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत जमीन खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : सोशल मीडियावरील मित्राला भेटायला गेली अन् विपरित घडलं, ७ वीच्या मुलीवर दोन दिवस सामूहिक बलात्कार

जरांगेंना मी नकोय, मला संपवण्याचा कट रचला जातोय, धनंजय मुंडेंचा पलटवार|VIDEO

Maharashtra Live News Update: मला संपून टाकण्याची ऑन एअर धमकी दिली- धनंजय मुंडे

Buldhana Horror: बुलढाण्यात काळरात्र! मुलाने कुऱ्हाडीने आई-बापाची हत्या केली, नंतर गळफास घेतला, २ मुलं थोडक्यात वाचली

T20 World Cup : पुन्हा अहमदाबादमध्येच फायनल, 2026 च्या वर्ल्डकपची ठिकाणं ठरली; भारत-पाकिस्तान सामना या शहरात

SCROLL FOR NEXT