कुख्यात गुंड निलेश घायवळचे आता नवनवे कारनामे समोर यायला सुरुवात झालीय.. घायवळचे कारनामे फक्त हत्या, मारामारी, खंडणी एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत तर घायवळचे हात जमिनींच्या व्यवहारातही गुंतलेत... लँड माफिया घायवळने जमीन व्यवहारातील टक्केवारी आणि खंडणीतून कोट्यवधींची संपत्ती जमवलीय.. त्याचा भांडाफोडच पोलीस तपासात झालाय...
आर्थिक गुन्हे शाखेने निलेश घायवळच्या संपत्तीवर छापे मारले.. त्याच्या घरात अनेक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, 10 तोळे सोनं, 3 दुचाकी आणि 1 स्कॉर्पिओ आढळून आलीय.. पुणे, अहिल्यानगर, धाराशिवमधील 40 जमिनींचे 7/12, पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित फाईल्स आढळून आल्या आहेत... एवढंच नाही तर एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावून 10 फ्लॅट बळकावल्याचंही समोर आलंय..
पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याचा भाऊ सचिन घायवळच्या घरेदी विक्रीच्या व्यवहाराची चौकशी सुरु केलीय..याच चौकशीनंतर घायवळच्या कुटुंबियांची 10 बँक खाती गोठवण्यात आलेत.. तसंच इतर व्यवहारांची चौकशीही सुरु करण्यात आलीय.. पुणे, अहिल्यानगर मध्ये झालेल्या अनेक जमिनीच्या व्यवहारात निलेश घायवळ ची भूमिका महत्त्वाची आहे...कारण थेट जागेच्या व्यवहारात पडून कमिशन म्हणजेच टक्केवारी fix करून घ्यायची ही निलेश ची स्टाईल आहे. त्याच्या विरोधात अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा टीका करायला सुरुवात केलीय. सत्ताधारी विरोधकांवर तर आघाडी युती वर सातत्याने टीका करताना दिसतेय
निलेश घायवळ याला भारतात परत आणण्यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयाला अर्ज केला आहे. "लॅन्ड माफिया" म्हणून वावरणारा घायवळ पोलिसांच्या हाती लागेपर्यंत त्याचे आणखी किती कारनामे समोर येतायत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.