Pune Police conducting a search at Sheetal Tejwani’s Pimpri residence; key documents and possible electronic gadgets seized during the raid. saam tv
मुंबई/पुणे

Pune Land Scam Case: पुणे पोलिसांकडून शितल तेजवानीच्या घराची झाडाझडती; महत्त्वाचे कागदपत्रे जप्त, कालाचिठ्ठा येणार बाहेर

Pune Land Scam Case: शीतल तेजवानीच्या घराची पुणे पोलिसांनी झाडाझडती घेतली. शीतलच्या घरातून महत्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आलीय आहेत.

Bharat Jadhav

  • ४० एकर जमीन घोटाळा प्रकरणात शितल तेजवानी मुख्य आरोपी

  • शितल तेजवानीच्या घराची झाडाझडती घेण्यात आली .

  • मूळ दस्त, कुलमुखत्यार पत्र आणि महत्त्वाची जमीन-संबंधित कागदपत्रे जप्त

पुणे पोलिसांनी शीतल तेजवानीच्या पिंपरीतील माहेरच्या घराची झाडाझडती घेतली. सध्या शीतल पोलीस कोठडीत आहे. यादरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेजवानीच्या घराची झाडाझडती घेतली. मागील १ तासापासून तेजवानीच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी पोलिसांनी महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. कागदपत्रांची पाहणी आणि तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे. काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट सुद्धा जप्त केली जाण्याची शक्यता आहे.

शितल तेजवानीच्या घरातून पोलिसांना मूळ कुलमुखत्यार पत्र, मूळ दस्त, तसेच ३०० कोटींपैकी काही रक्कम जप्त करायची आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलीस पिंपरीच्या घरावर धाड टाकली. शीतल तेजवानी आणि तिचे पती सागर सूर्यवंशी सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र तिचं माहेर हे पिंपरीतील वैष्णो देवी मंदिराजवळ आहे. शितलने याचं माहेरच्या घरात काही पुरावे दडवून ठेवले असतील, अशी शंका पुणे पोलिसांना आहे.

मुंढव्यातील ४० एकर जमीन घोटाळा प्रकरणात आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केलीय. याप्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून तिची चौकशी देखील करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. प्रकरणातील तपासाचा वेग वाढवल्यानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधार म्हणून शीतल तेजवानीची याआधी दोन वेळा चौकशी केली होती.

जेव्हा तपासात त्याचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले तेव्हा अखेर तिला अटक करण्यात आली. पुणे जमीन घोटाळा प्रकरणात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी शीतल तेजवानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेजवानी यांनी त्यांच्या याचिकेत दावा केला होता की मीडिया रिपोर्ट्समुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. दुसऱ्या जमीन प्रकरणात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आज सुट्टी

Accident : पुण्याहून निघाले पण पहाटे काळाचा घाला, भयंकर अपघातात ४ जणांचा मृत्यू, २० जखमी

Famous Director Passes Away : प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ब्रेन स्ट्रोकशी झुंज अपयशी, मनोरंजनविश्वावर शोककळा

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! पीएम किसानचे ₹२००० कधी येणार; या दिवशी होऊ शकते घोषणा

Chutney Recipe : थंडीत जेवणाच्या पानात असायलाच हवी 'ही' चटणी, मजबूत हाडांसाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT