पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट; शितल तेजवानीला अटक|VIDEO

Sheetal Tejwani Arrested In Mundhwa Land Scam: पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारातील गंभीर गैरव्यवहार प्रकरणात प्रमुख आरोपी शितल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी मुंढवा येथील जमीन व्यवहारातील गैरव्यवहार प्रकरणी शितल तेजवानीला अटक केली आहे. या प्रकरणात तेजवानी ही जमीन प्रकरणातील कुलमुख्यतधारक असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

मुंढवा परिसरातील जमिनीच्या खरेदी-विक्रीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप असून, या व्यवहारात तेजवानी मुख्य सूत्रधार असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच हा गैरप्रकार समोर आला होता. यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे पोलिसांकडून जलदगतीने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com