Pune Drugs Party Case Saam tv
मुंबई/पुणे

Pune Drug Party Case : पुण्याच्या एल३ पबमधील पार्टीत टॉयलेटमध्ये २ तरुणी घेत होत्या ड्रग्ज, Exclusive Video सामच्या हाती

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुणे शहरातील ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील एफसी रोडवरील एल३ पबमधील पार्टीत तरुण-तरुणींनी ड्रग्ज पार्टी केल्याचं उघड झालं आहे. या पार्टीतील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. या पार्टीतील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुणी ड्रग्जचे घेत असल्याचं समोर आलं आहे. ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ सामच्या हाती आला आहे.

पुणे ड्रग्ज प्रकरणातील आणखी एक व्हिडिओ समाज सोशल मीडियातून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे-नगर रस्त्यावरील एका नामांकित मॉलमध्ये असलेल्या पबमधीलच ड्रग्ज घेतानाताचा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे. याच पबमधील काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येत आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

तरुणीचे टॉयलेटमधील ड्रग्जचं सेवन करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. एवढेच नाही तर त्यांचा व्हिडिओ काढणारी तरुणी त्यांना ड्रग्ज कसे घ्यायचे, याचा फॉर्मुला सांगताना दिसत आहे. पुण्यातील पबमध्ये असाच प्रकारचा सुरु नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या ड्रग्ज प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली होती कारवाई

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्काच्या वतीने १८ एप्रिल रोजी एल३ बारवर कारवाई करण्यात आली होती. या बारमध्ये अंतर्गत बदल केल्याने कारवाई करण्यात आली होती. व्हायरल व्हिडिओ प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्कांकडून हा बार सील करण्यात आला होता.

या पार्टीची परवानगी देखील नसल्याचं समोर आल आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे ग्राऊंड आणि पहिल्या मजल्यआची परवानगी असल्याची मिळत आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्कांकडून गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

Team India Announced: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमारकडे कर्णधारपदाची जबाबदारी, संघात कोणाला मिळाली संधी? वाचा

SCROLL FOR NEXT