Pune Crime News अश्विनी जाधव केदारी
मुंबई/पुणे

पुणे: उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा रागातून डोक्यावर वार करत तरुणाचा खून!

उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्‍यावर वार करत खून करण्यात आला.

अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे

अश्विनी जाधव केदारी

पुणे: उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्‍यावर वार करत खून करण्यात आला. ही घटना फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Pune Crime News)

युवराज बाबुराव जाधव (वय 34) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडिल बाबुराव माणिक जाधव (वय 55) यांनी फिर्याद दिली आहे. तर गणेश सुरेश खरात (वय 35,रा.पापडे वस्ती, फुरसुंगी) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी यांची दुध डेअरी आहे. त्यांचा मुलगा त्यांना व्यवसायात मदत करतो. तर आरोपी गणेश हा मिळेल तशी मोलमजुरीची कामे करतो. त्याने फिर्यादीचा मुलगा युवराज याच्याकडून 20 हजार रुपये उधार घेतले होते. युवराज हा गणेशकडे सातत्याने दिलेले पैसे मागत होता. (Pune Latest News)

हे देखील पहा-

रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गणेश हा युवराज याच्या घराबाहेर आला होता. तेव्हा युवराजने पुन्हा एकदा गणेशकडे पैशासाठी तगादा लावला. याचा राग आल्याने गणेशने जवळील कुऱ्हाडीने युवराजच्या डोक्‍यावर सपासप वार केले. युवराजच्या डोक्‍यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि तोंडावर गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकीला जुलै महिन्याचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर, आजच नोट करा

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल, संपूर्ण देशाचं लक्ष

Raksha Bandhan: रक्षाबंधनपासून 3 राशींची होणार चांदीच चांदी; शनी-मंगळ बनवणार पॉवरफुल योग

Success Story: संघर्षाच्या काळात गर्लफ्रेंडने दिली साथ; कोणत्याही कोचिंगशिवाय क्रॅक केली JPSC; अमन कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

ladki bahin yojana : अपात्र महिला आणि बोगस भावांना दणका; अपात्र लाडक्यांकडून पैसे वसूल करणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT