Kirit Somaiya
Kirit SomaiyaSaam Tv

किरीट सौमय्यांच्या अडचणीत भर? RTI कार्यकर्त्याकडून धक्कादायक माहिती उघड

किरीट सौमय्यांनी INS Vikrant साठी जमविलेल्या पैशांचे काय केले? RTI तून माहिती उघडकीस
Published on

रश्मी पुराणिक

मुंबई - भाजप नेते किरीट सौमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नील सोमय्या तसेच वाधवान कुटुंबीय यांचे आर्थिक संबंध असल्याचे पुरावे देण्यात आले. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी धक्कदायक माहिती आरटीआयमधून उघडकीस आली आहे.

हे देखील पहा -

आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून या प्रकरणात माहिती मागवली होती. असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं आरटीआयमध्ये उघड करण्यात आलं आहे. आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसै जमा केले होतो. भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत ६० कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला.

Kirit Somaiya
बँकेतील तारण ठेवलेल्या सोन्यावर डल्ला; बँक अधिकाऱ्यासह साथीदाराला अटक

आयएनएस विक्रांत या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. १९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती.

‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ६० कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com