Pune Saam
मुंबई/पुणे

Pune News: संतापजनक! 'तुझ्या मुलाला ५० हजारात विक', आईचा स्पष्ट नकार; नराधमाने चिमुकल्याला उचललं आणि..

Pune Police Crack Kidnapping Case: पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाढवळ्या एका ८ वर्षांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांनी तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Bhagyashree Kamble

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाढवळ्या एका ८ वर्षांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. मुलाला ५० हजाराला विकण्यासाठी आरोपीने अपहपण करून काशी एक्सप्रेसने पळ काढण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळाल्यानंतर चिंचवड पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाने आरोपीला पकडले, तसेच मुलाची सुटका केली. नंतर चिमुकल्याला त्याच्या आई - वडिलांकडे सुपूर्द केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून, आरोपीने मुलाचे अपहरण का केले? याचा शोध सुरू आहे.

नक्की प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव गजानन पानपाटील असे आहे. तो चार दिवसांपूर्वी चिंचवडमध्ये आला होता. पीडित मुलाच्या कुटुंबाच्या घरी तो वारंवार जात असल्याची माहिती आहे. तो मुलाला चॉकलेट आणि बिस्किटांचे आमिष दाखवत होता. तसेच मुलासोबत गोड बोलायचा. एके दिवशी आरोपीने मुलाच्या आईकडे वेगळीच मागणी केली. मुलाला ५० हजार रूपयांमध्ये विकण्यास सांगितले.

आरोपीने केलेल्या मागणीवर मुलाच्या आईने स्पष्ट नकार दिला. नंतर आरोपीने मुलाचे अपहरण करण्याचे ठरवले. ३१ मार्चला मुलाचे आई - वडील कामाला गेले होते. आरोपीने मुलाचे अपहरण करून थेट चाळीसगावात धूम ठोकली. सायंकाळी मुलाची आई आणि वडील आले. त्यांनी मुलाची शोधाशोध केली. मात्र, मुलगा कुठेच सापडला नाही. मुलाच्या आई वडिलांना गजाननवर संशय आला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

चिंचवड पोलिसांना तपासात आरोपी मुलाला चाळीसगावात घेऊन गेल्याचे समोर आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला एक्सप्रेसमधून ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याला पिंपरी चिंचवडला आणण्यात आले. दरम्यान, आरोपीला २ मुले असूनही त्याने मुलाचे अपहरण का केले? आणि कुणासाठी केले? मुलाला विकायचा प्लान होता का? याचाही तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या पथकाकडून शिंदेंच्या मंत्र्यांची बॅग तपासणी|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

Crime News : तुझी शेवटची इच्छा काय? सिगारेट अन् दारू पाजली, नंतर धारदार शस्त्राने वार करत मित्राला संपवलं; हत्याकांडाने पुणे हादरले

Brain Tumor: सतत होणारी डोकेदुखी म्हणजे ब्रेन ट्यूमर तर नाही? न्यूरोसर्जनने सांगितलं कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

Prajaktaraj: प्राजक्ता माळीने नम्रता संभेरावला दिले खास शिंदेशाही तोडे, PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT