Pune Girls Hostel Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Girls Hostel Fire: पुण्यात वसतिगृहाला भीषण आग; एकाचा मृत्यू तर ४८ मुलींना सुखरुप बाहेर काढण्यात यश

Pune Girls Hostel Fire News: पुण्यातील कमठेकर रोडवरील मुलींच्या वसतिगृहाला भीषण आग लागली आहे. या आगीत ४८ मुलींना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे,साम टीव्ही पुणे

पुण्यात मुलींच्या वसतिगृहात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला असून मुली काही प्रमाणात जखमी झाल्या आहेत. वसतिगृहात अचानक आग लागल्याने मुलींना खूप भीती वाटली. इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कुमठेकर रोडवर एका इमारतीतल खाजगी शैक्षणिक संस्था आहे. या इमारतीच्या दोन मजल्यावर मुलींचे वसतिगृह आहे. याच वसतिगृहाला अचानक आग लागली. या दुर्घटनेत सागर कुलकर्णी या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

शैक्षणिक संस्थेच्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर अभ्यासिका आहे तर दुसऱ्या मजल्यावर स्टडी रुम आणि इतर मजल्यावर मुलींच्या राहण्याची सोय केली होती.

गुरुवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काही वेळातच आग विझवली. आग लागलेल्या इमारतीत ४८ मुली राहत होत्या. आग लागल्यावर तळमजल्यावर राहणाऱ्या मुलींनी टेरेसवर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांची सर्व मुलींना बाजूच्या इमारतीवरुन शिडीच्या साहाय्याने बाहेर काढले. मात्र, या ठिकाणी काम करत असलेल्या सागर यांचा गुदमरुन मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT