Maharashtra Politics: लोकसभेच्या निकालानंतर महायुतीचं टेन्शन वाढलं, मविआ सुसाट; मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांवरील गणित बदललं

Mahavikas Aghadi Votes Lead In 20 Assembly Seats And Mahayuti 16: लोकसभेच्या निकालानंतर महायुतीचं टेन्शन वाढल्याचं दिसत आहे. निकालानंतर मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांवरील गणित बदललं आहे.
महायुतीचं टेन्शन वाढलं, मविआ सुसाट
Maharashtra PoliticsSaam Tv

लोकसभेच्या निकालानंतर मुंबईतील विधानसभेच्या जागांवरील आकड्यांचं गणित बदललं आहे. मुंबईमध्ये विधानसभेच्या एकूण ३६ जागा आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालामध्ये महाविकास आघाडीला मुंबई शहर आणि उपनगरात एकूण २० जागांवर आघाडी मिळाल्याचं दिसतंय. तर महायुतीला देखील १६ जागांवर विजय मिळाला आहे. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी महाविकास आघाडीने चार जागांवर विजय मिळवला, तर उर्वरित दोन जागा महायुतीने जिंकल्या आहेत.

विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचा समावेश असलेल्या महायुतीने ३० जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपने १६ जागांवर विजय मिळवला होता, तर शिवसेनेला १४ जागांवर यश मिळालं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनुक्रमे ४ आणि १ जागा जिंकली होती, तर समाजवादी पक्षाला एक जागा मिळाली होती. परंतु मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपसोबत युती केली, त्या महायुतीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election 2024) १६ जागा मिळाल्या आहेत. तर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीला मुंबईमध्ये २० जागांवर आघाडी मिळाली आहे.

या आकडेवारीनुसार, ३६ पैकी सुमारे १० विधानसभा जागांवर विद्यमान आमदारांच्या पक्षाच्या विरोधात मतदान झाल्याचं दिसत आहे. लोकसभेत मुंबई उत्तर-पश्चिममध्ये शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि मुंबई दक्षिणमध्ये यामिनी जाधव हे दोन उमेदवार होते. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांनी २०१९ मध्ये विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यांना त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात कमी मतं मिळाल्याचं समोर आलं आहे.

मुंबई उत्तर-पश्चिममध्ये शिंदेसेनेचे रवींद्र वायकर केवळ ४८ मतांनी विजयी झाले (Maharashtra Politics) आहेत, तर जोगेश्वरी पश्चिममध्ये दहा हजार मतांनी पिछाडीवर आहे. वायकर यांनी याआधी २०१९ मध्ये सेनेचे संयुक्त उमेदवार म्हणून ही विधानसभा जागा जिंकली होती. वर्सोवा विधानसभेत भाजप आमदार भारती लवेकर यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. या मतदारसंघात विजयी उमेदवार रवींद्र वायकर यांना २१ हजारपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत.

महायुतीचं टेन्शन वाढलं, मविआ सुसाट
Lok Sabha Election Result: नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याची वेळ आणि तारीख ठरली, 8 जूनऐवजी या दिवशी घेणार शपथ?

मुंबई उत्तर मध्यमध्ये कुर्ला आणि चांदिवली येथील शिंदे शिवसेनेचे आमदार आहेत, तरीही भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना आघाडी मिळू शकली नाहीत. वांद्रे पूर्वचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दिकी हे काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड (Mahavikas Aghadi) यांच्या प्रचाराला अनुपस्थित होते. तरीही गायकवाड यांनी या जागेंवर आघाडी घेतली आहे. ईशान्य मुंबईत भाजप आमदार राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिममधून ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना सोळा हजार मतांनी आघाडी मिळाली आहे. मुंबई दक्षिणमध्ये शिंदेसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव २०१९ च्या विधानसभा (Assembly Seats) निवडणुकीत जिंकलेल्या भायखळा विधानसभा जागेवर ४५ हजारपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत.

मुंबई दक्षिण मध्यमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांनी शिंदेसेनेचे राहुल शेवाळे (Mahayuti) यांचा पराभव केला आहे. सायन-कोळीवाडा विधानसभेत भाजपचे आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांनी प्रतिनिधित्व केलं. तरी सायन-कोळीवाडा जागेवर शेवाळे आठ हजारहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगरमध्येही शेवाळेंना आघाडी मिळवता आली नसल्याचं दिसत आहे. फक्त मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला अपेक्षित मताधिक्य मिळाल्याचं दिसत आहे.

महायुतीचं टेन्शन वाढलं, मविआ सुसाट
Baramati Lok sabha : बारामतीत सुप्रिया सुळे दीड लाखांच्या मताधिक्याने जिंकल्या, अजित पवार गटाचं गणित कुठं फसलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com