Badlapur Women Fight: शौचालयाच्या चावीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी; दुकान बनलं WWF चा आखाडा|Video Viral

Badlapur Women Fight Video: बदलापूर स्टेशनजवळील एका दुकानात शौचालयाच्या चावीवरून दोन महिला कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार भांडण झाले. मार्केट कॉम्प्लेक्समधील ही घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. सोशल मीडियावर हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Badlapur Women Fight Video
A fierce fight broke out between two women over a toilet key in a commercial complex outside Badlapur station.saam tv
Published On

बदलापूर स्टेशनबाहेर दुकानात महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. व्यापारी संकुलातील शौचालयाच्या चावीवरुन दोन दुकानांमधील काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. बदलापूर स्टेशनबाहेर असलेल्या एका दुकानात ही घटना घडली. या दोन्ही महिला दोन वेगवेगळ्या दुकानात काम करणाऱ्या महिला आहेत. शौचालयाच्या चावीवरून या दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर त्यांच्यात चांगलीच जुंपली. बदलापूर पुर्वेकडील अंबिका हॉटेलजवळच्या व्यापारी संकुलात हा प्रकार घडलाय. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. बदलापूर पोलिस या प्रकरणी पुढील तपास करतायेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com