illegal flex  Saam
मुंबई/पुणे

Pune BJP : भाजपचा स्थापना दिवस अन् अनधिकृत फ्लेक्सची बजबजपुरी, पुणे महापालिका कारवाई करणार?

BJP foundation day Pune illegal flex banners controversy : पुण्यात भाजप स्थापना दिन कार्यक्रमादरम्यान अनधिकृत फ्लेक्स लावल्याचा वाद पेटला आहे. बालगंधर्व परिसरात बॅनरबाजी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याने पुणे महापालिका कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Akshay Badve

BJP foundation day illegal flex banners Pune : भारतीय जनता पार्टी स्थापना दिनाच्या निमित्ताने पुणे शहरात आज भाजपकडून 46 वर्ष समर्पणाची 46 वर्ष भाजपाची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाशजी तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पुणे शहरातील सर्व नेते तसेच पदाधिकारी, नगरसेवक यांनी उपस्थिती दर्शवली. मात्र याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बालगंधर्व रंग मंदिराच्या बाहेर अनधिकृत फ्लेक्सचा शब्दशः रतीब पाहायला मिळाला. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाला शुभेच्छा देण्यासाठी शहरातील विविध भागातल्या नगरसेवकांनीच हे फ्लेक्स लावल्याचं आढळून आलं.

पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त बालगंधर्व येथील मुख्य चौकात किमान दहा ते बारा भले मोठे फ्लेक्स तर जंगली महाराज रस्त्यावरील असलेल्या पदपथावरील प्रत्येक इलेक्ट्रिक खांबाला काही छोटे तर काही मोठे बॅनर लावण्यात आले. विशेष म्हणजे या सगळ्या फ्लेक्सवर शहरातीलच अनेक बड्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले होते. यामुळे एका बाजूला अनाधिकृत बॅनरबाजी तसेच अतिक्रमण विरोधी भूमिका घेणाऱ्या भाजपवर टिकेची झोड उठली आहे. या कार्यक्रमानिमित्त अपुरी पार्किंग व्यवस्थेमुळे कार्यक्रमाला आलेल्या अनेक पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर ठेवत थेट जंगली महाराज रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली. काही "महाशयांनी" तर जवळ असलेल्या बस स्टॉप वर सुद्धा आपली वाहने पार्क केली.

पुणे महापालिकेकडून सध्या शहरभर अतिक्रमण तसेच अनधिकृत बॅनरवर कठोर कारवाई केली जात आहे. अशात सत्ताधारी भाजपने उभ्या केलेल्या ढीगभर फ्लेक्सवर महापालिका काही कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात कुठेही अनाधिकृत फ्लेक्स लावू देऊ नका किंबहुना पक्षातील नेतेमंडळींनी सुद्धा अनाधिकृत फ्लेक्स लावू नये असे स्पष्ट निर्देश दिले होते. आता मुख्यमंत्री यांनीच दिलेल्या निर्देशाला पक्षातील लोकांनीच केराची टोपली दाखवली आहे का काय असा प्रश्न उभा राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये पावसाची हजेरी

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

Chanakya Niti : खोटं व्हायला शिका नाहीतर दुनिया देईल धोका, चाणक्यांनी सांगितली ५ गंभीर गुपितं

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

SCROLL FOR NEXT