Pune Crime News Saam TV News
मुंबई/पुणे

Pune Crime : हॉस्टेलमधील मुलींची छेड काढल्याचा संशय, मालकानं अन् सुनेनं बेदम चोपलं, कानाचा कडकडून चावा; ५ टाके पडले

Pune Crime News : जेवण झाल्यानंतर मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना हॉस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन हॉस्टेलचालक आणि त्यांच्या सुनेने तरुणाला मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Prashant Patil

सागर आव्हाड, साम टिव्ही

पुणे : जेवण झाल्यानंतर मित्रासोबत गप्पा मारत थांबले असताना हॉस्टेलमधील मुलींची छेड काढल्याच्या संशयावरुन हॉस्टेलचालक आणि त्यांच्या सुनेने तरुणाला मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉस्टेलचालकाच्या सुनेने त्या तरुणाच्या कानाचा चावा इतका जोरात घेतला की त्याच्या कानावर पाच टाके घालावे लागले. याबाबत मिलिंद वसंत कोठारी (वय ४०, रा. दत्त वसाहत, दक्षिणमुखी मारुती मंदिरासमोर, शिरोळे रोड, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुरेश विठ्ठल कांबळे (वय ६०) आणि त्यांची सून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद कोठारी हे ड्रायव्हर म्हणून नोकरी करतात. सोमवारी दुपारी ते जेवण करुन घराबाहेर उभे असणारे मित्र अभिजित जाधव, अमित खेंगरे यांच्याबरोबर गप्पा मारत होते. त्यावेळी तेथे लोकमान्य गर्ल्स हॉस्टेल चालविणारे सुरेश विठ्ठल कांबळे व त्यांची सुन आली. कांबळे यांनी तुम्ही मुलींना का छेडता? असं म्हणून फिर्यादी यांच्याशी भांडायला लागले. तेव्हा फिर्यादी यांनी 'आम्ही त्यांना छेडत नाही. आम्ही गप्पा मारत उभे आहोत,' असे म्हणाले. त्यावर त्यांनी व त्यांच्या सुनेने त्यांना मारण्यास सुरुवात केली. त्या झटापटीत त्यांच्या सुनेने फिर्यादी यांच्या उजव्या कानाचा जोरात चावा घेऊन जखमी केलं.

त्यांच्या पोटाला दोन ठिकाणी कटरसारख्या धारदार हत्याराने मारलं. मिलिंद कोठारी यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या कानाला पाच टाके घालण्यात आले. तर पोटावर दोन्ही ठिकाणी दोन दोन टाके घालावे लागले. डेक्कन पोलिसांनी ससून रुग्णालयात जाऊन त्यांची फिर्याद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक प्रविण कुलकर्णी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT