Hinjewadi Abhilasha Suicide Saam Tv News
मुंबई/पुणे

Hinjewadi Abhilasha Death : हिंजवडीत २१व्या मजल्यावरुन उडी, अभिलाषाच्या रुममध्ये पोलिसांना मोठा पुरावा सापडला; मैत्रीण म्हणते तिच्या...

Hinjewadi Abhilasha Suicide : अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी पोलिसांनी संपर्क साधला. अभिलाषा रात्री एक वाजेपर्यंत रूममध्ये होती. त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले असता ती रूममध्ये दिसून आली नाही.

Prashant Patil

पुणे : माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून आयटी अभियंता असलेल्या तरुणीने इमारतीच्या २१व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये ३१ मे रोजी ही घटना घडली.

अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (२५, रा. हिंजवडी) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. अभिलाषा हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. तिची एक मैत्रीण द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. ३१ मे रोजी पहाटे ती मैत्रीण राहत असलेल्या सोसायटीमध्ये दुचाकीवरून आली. लिफ्टने इमारतीच्या २१ व्या मजल्यावर गेली. तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पटवली. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं.

अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी पोलिसांनी संपर्क साधला. अभिलाषा रात्री एक वाजेपर्यंत रूममध्ये होती. त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले असता ती रूममध्ये दिसून आली नाही. त्यावेळी बाथरूम भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले. परंतु त्याबाबत लक्षात आलं नाही. त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता, अभिलाषा रूममध्ये आली नव्हती. त्यामुळे तिच्याशी संपर्क करत होते. परंतु तिचा फोन बंद असल्याने संपर्क झाला नाही. काही वेळाने पोलिसांकडून मला या घटनेबाबत समजलं. त्यानंतर आम्ही पुन्हा रूमची पाहणी केली असता अभिलाषा हिच्या बेडवरील नॅपकिन व इनरवर रक्ताचे डाग दिसून आले, असं अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितलं.

पोलिसांनी घरात पाहणी केली असता, अभिलाषा हिने लिहिलेली सुसाईड नोट मिळून आली. ‘माझी जगायची इच्छा संपली आहे. मी हे स्वत:च्या मर्जीने करत आहे’ असे चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. रक्ताचे डाग असलेले नॅपकिन, इनर, उशीचे कव्हर आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT