Hinjewadi News : बाथरुमध्ये, बेडवरील नॅपकिनवर रक्ताचे डाग, अन्...; हिंजवडीतील अभिलाषा आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर

Hinjewadi IT Engineer Abhilasha Suicide : अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (२५, रा. हिंजवडी) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. अभिलाषा हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती.
Hinjewadi IT Engineer Abhilasha Suicide
Hinjewadi IT Engineer Abhilasha SuicideSaam TV News
Published On

पुणे : माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून आयटी अभियंता असलेल्या तरुणीने इमारतीच्या २१व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये ३१ मे रोजी ही घटना घडली.

अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (२५, रा. हिंजवडी) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. अभिलाषा हिंजवडी आयटी पार्कमधील एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. तिची एक मैत्रीण द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये राहत होती. ३१ मे रोजी पहाटे ती मैत्रीण राहत असलेल्या सोसायटीमध्ये दुचाकीवरून आली. लिफ्टने इमारतीच्या २१ व्या मजल्यावर गेली. तेथून तिने उडी मारून आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोसायटीच्या पार्किंगमध्ये आढळलेल्या दुचाकीवरून पोलिसांनी अभिलाषा हिची ओळख पटवली. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं.

Hinjewadi IT Engineer Abhilasha Suicide
Pune Engineer Death : २१व्या मजल्यावरुन थेट उडी, 'त्या' १२ मिनिटात खेळ संपला; अंतिम घटकेला इंजिनीअर तरुणी काय करत होती?

बाथरुमच्या भिंतीवर रक्ताचे डाग

अभिलाषा हिच्यासोबत राहत असलेल्या तिच्या मैत्रिणीशी पोलिसांनी संपर्क साधला. अभिलाषा रात्री एक वाजेपर्यंत रूममध्ये होती. त्यानंतर मी सकाळी पाच वाजता उठले असता ती रूममध्ये दिसून आली नाही. त्यावेळी बाथरूम भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले. परंतु त्याबाबत लक्षात आलं नाही. त्यानंतर मी पुन्हा सकाळी दहा वाजता उठले असता, अभिलाषा रूममध्ये आली नव्हती. त्यामुळे तिच्याशी संपर्क करत होते. परंतु तिचा फोन बंद असल्याने संपर्क झाला नाही. काही वेळाने पोलिसांकडून मला या घटनेबाबत समजलं. त्यानंतर आम्ही पुन्हा रूमची पाहणी केली असता अभिलाषा हिच्या बेडवरील नॅपकिन व इनरवर रक्ताचे डाग दिसून आले, असं अभिलाषाच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितलं.

Hinjewadi IT Engineer Abhilasha Suicide
Dhule Crime : अनैतिक संबंधातून जवानाकडून बायकोला विषारी इंजेक्शन, घटनेला धक्क्कादायक वळण, पोलीस मुळापर्यंत पोहोचले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com