Pune Engineer Death : २१व्या मजल्यावरुन थेट उडी, 'त्या' १२ मिनिटात खेळ संपला; अंतिम घटकेला इंजिनीअर तरुणी काय करत होती?

Pune Hinjewadi Engineer Girl Suicide : अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे असं या इंजिनीअरचं नाव आहे. ‘सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेनं करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे…’ अशी चिठ्ठी लिहून तिनं आत्महत्या केलीय.
Pune Hinjewadi Engineer Girl Suicide
Pune Hinjewadi Engineer Girl SuicideSaam Tv News
Published On

पुणे : पुण्यातील हिंजवडीत एका २५ वर्षीय इंजिनीअर तरूणीनं २१व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. 'सॉरी मला माफ करा, मी स्वच्छेनं हे पाऊल उचलत आहे, माझी आता जगायची इच्छा नाही' असं चिठ्ठीत लिहून तिनं टोकाचं पाऊल उचललं. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडिओ तरूणीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत आत्महत्या करण्यापूर्वी तिने काय काय केलं, हे समोर आलं आहे. तर या तरुणीनं आत्महत्या कधी आणि कशी केली, त्या १२ मिनिटातच सर्व खेळ कसा संपला. त्याची माहिती देखील समोर आली आहे.

अभिलाषा भाऊसाहेब कोथंबिरे असं या इंजिनीअरचं नाव आहे. ‘सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेनं करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे…’ अशी चिठ्ठी लिहून २५ वर्षीय अभिलाषाने हिंजवडीमधील द क्राऊन ग्रीन सोसायटीच्या २१व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना ३१ मे च्या पहाटेच्या सुमारास घडली.

Pune Hinjewadi Engineer Girl Suicide
Dhule Crime : अनैतिक संबंधातून जवानाकडून बायकोला विषारी इंजेक्शन, घटनेला धक्क्कादायक वळण, पोलीस मुळापर्यंत पोहोचले

'त्या' १२ मिनिटात काय घडलं?

अभिलाषा घटनेच्या दिवशी पहाटे ४.३० सुमारास दुचाकीने सोसायटीच्या आवारात आली. त्यानंतर ती लिफ्टने २१व्या मजल्यावर आपल्या घरी जात पहाटे ४.४२ सुमारास तिने आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आहे. अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरील महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी अभिलाषाच्या मृत्यूची आकस्मिक नोंद केली असून , या घटनेत कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा संशयास्पद काही संकेत आढळून आलं नसल्याचं म्हटलं आहे.

रुममध्ये सापडली चिठ्ठी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिलाषानं नैराश्यातून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. तिच्या खोलीची झाडाझडती घेतली असता तिने लिहिलेली सुसाइड नोट सापडली आहे. त्यावर 'सॉरी मला माफ करा, मी हे स्वच्छेने करत आहे, माझी आता जगायची इच्छा संपली आहे', असं लिहिलेलं आढळून आलं आहे. याबाबत अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Pune Hinjewadi Engineer Girl Suicide
Kolhapur: पैसे आण नाहीतर पोटावर लाथ मारेन...पुण्यानंतर कोल्हापुरातील गर्भवती पत्नीसोबत धक्कादायक कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com