PMRDA launches 3 key road projects in Hinjawadi-Mulshi worth ₹64 Cr to solve Pune’s severe IT corridor traffic problem. New roads aim to cut travel time and reduce congestion. Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?

Hinjawadi traffic Update : हिंजवडी-मुळशी वाहतूक कोंडीला PMRDA कडून दिलासा! ६४ कोटींच्या निधीतून तीन नवीन रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले. या रस्त्यांमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

Namdeo Kumbhar

Mulshi-Hinjawadi smart road infrastructure : आयटी हब असलेले हिंजवडी आणि मुळशीमध्ये भयंकर वाहतूक कोंडी होते. गेल्या काही दिवसांपासून तर वाहतूक कोंडीने उच्चांक गाठला आहे, ही पुणे शहरातील एक गंभीर समस्या झाली. हिंजवडी आयटी पार्कमुळे या भागात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यात रस्ते हवे तसे नाहीत, मेट्रोची कामे सुरू आहेत, याचा परिणाम वाहतुकीवर होतोय. पण आता ही कटकट संपणार आहे. पुढील काही महिन्यात हिंजवडीमध्ये मेट्रो तर सुरू होणारच आहे. पण PMRDA ने मुळशी आणि हिंजवडीच्या वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवा मार्ग काढला आहे.

पुण्यातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या या औद्योगिक आणि आयटी कॉरिडॉरमधील वाहतूक कोंडीचा त्रास अनेकांना होतोय. येथील रस्ते पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने मोठं पाऊल उचलले आहे. हिंजवडी आयटी पार्क आणि मुळशी तालुक्यातील MIDC परिसरात तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा विकास सुरू करण्यात आला आहे. या नव्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार आहे. हे रस्ते कोणते आहेत? कोणत्या भागातील वाहतूक सुरळीत होणार? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

PMRDA कोणते तीन रस्ते बांधणार?

म्हाळुंगे ते हिंजवडी फेज १

रोडची लांबी : 1.50 किमी

रुंदी: 36 मीटर

अंदाजित खर्च: 13.05 कोटी रुपये

ठाकर वस्ती ते माण गावठाण

रोडची लांबी: 2.40 किमी

अंदाजित खर्च: 20.88 कोटी रुपये

सूर्या हॉस्पिटल ते ठाकर वस्ती

रोडची लांबी : 3.50 किमी

अंदाजित खर्च : 30.45 कोटी रुपये

वरील तिन्ही प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रस्ते संपर्क सुधारण्यासाठी, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि व्यावसायिक तसेच स्थानिकांचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान होण्यासाठी तिन्ही रस्ते डिझाइन केले आहेत, असे  पीएमआरडीए अधिकाऱ्याने सांगितले.

हिंजवडी आणि मुळशी परिसरातील वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक आणि आयटी कर्मचारी त्रस्त आहेत. १० मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल एख तासांचा वेळ लागतो. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे सर्वजण वैतागले आहेत. PMRDA कडून यावर तोडगा काढण्यासाठी तीन नवे रस्ते तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, मेट्रो सुरू झाल्यास दीर्घकालीन दिलासा मिळू शकतो. तिन्ही रस्ते पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीची कटकट संपणार आहेच. प्रवासाचा वेळही वाचणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकांची तयारी सुरू, राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश, बिगूल कधी वाजणार? VIDEO

Waterfalls near Neral: गर्दी कमी आणि लांब जाण्याचीही गरज नाही! नेरळ-माथेरान जवळ आहेत 'हे' लपलेले धबधबे

Pune Shivneri Bus : दारु पिऊन शिवनेरी चालवत होता, प्रवाशांनी दारुड्या चालकाला रंगेहाथ पकडले अन् पुढे...

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT