Pune Heat Wave Yandex
मुंबई/पुणे

Pune Heat Wave: पुण्यात उन्हाचे चटके असह्य; उष्माघाताने तहानल्या, पाण्यातून विषबाधा झाल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू

Heat Stroke In Pune: पुण्यात सध्या उन्हाचे चटके असह्य होत आहेत. उष्माघाताने तहानल्यामुळे शेळ्या आणि मेंढ्या शेतातील साचलेले पाणी प्यायल्या. त्यामुळे विषबाधा होऊन त्यांच्या मृत्यू झाल्याची घटना शिरूरमध्ये घडली आहे.

Rohini Gudaghe

सागर आव्हाड साम टीव्ही , पुणे

पुण्यात सध्या उन्हाचे चटके असह्य होत आहेत. उष्माघाताने तहानल्यामुळे शेळ्या आणि मेंढ्या शेतातील साचलेले पाणी प्यायल्या. त्यामुळे विषबाधा होऊन त्यांच्या मृत्यू झाल्याची घटना शिरूरमध्ये घडली आहे. एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. तर दुसरीकडे शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या मेंढ्यांनी शेतातील साचलेले पाणी पिल्यामुळे विषबाधा (Poisoning) झाली.

मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे यांच्या ९ शेळ्या आणि ५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली (Pune Heat Wave) आहे. मलठण येथे उष्माघाताने ४ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत मेंढपाळांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ऐन दुष्काळात जनावरांचा मृत्यू झाल्याने नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

उन्हाळा कडक असल्यामुळे जनावरांना आवश्यकतेनुसार पाणी पाजावे. प्रथम पाणी दूषित आहे का? याची खात्री करूनच जनावरांना पाणी पाजलं पाहिजे. तसंच उन्हाच्या वेळी कांद्याची पात शेळ्या मेंढ्यांना चारू नये, योग्य प्रमाणात दिली जावी. दुपारच्या कडक उन्हात शेळ्या मेंढ्या चारण्याऐवजी सावलीला बसवाव्यात, असं आवाहन संबंधित प्रशासनाकडून करण्यात आलं (Heat Stroke In Pune) आहे.

आठवडाभरापासून पुणे शहर आणि जिल्ह्याचं सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. पुढील आठवड्यातही हेच तापमान कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला (Pune News) आहे. पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील. तसंच दिवसभर उन्हाचा चटका तापदायक ठरेल, वेधशाळेने अशी वेधशाळेने वर्तवली आहे. सध्या मराठवाड्यावर समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात देखील मागील आठवडाभरापासून उष्णतेची लाट कायम आहे. आज कमाल तापमान ४३ पूर्णांक २ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT