School bus  Saam TV News
मुंबई/पुणे

Pune Accident : स्कूल बसने माय लेकाला उडवले, पोराच्या डोक्यावर चाक गेलं, जागेवर मृत्यू

Maharashtra school bus Accident News : पुण्यातील हडपसर येथे स्कूल बसच्या धडकेत ५ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी आहे. बसचालकासह शाळेच्या संस्थापक आणि प्रमुखांवर गुन्हा दाखल.

Namdeo Kumbhar

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune School Bus Accident News : पुण्यातील हडपसरमध्ये स्कूल बसच्या धडकेत पाच वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली. ही घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात घडली. या प्रकरणी बसचालक आणि मोडक इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापकांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईनाथ तुळशीराम भंगारे (वय ५, रा. गणराज हाईट, उरुळी देवाची) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. त्याची आई रेखा तुळशीराम भंगारे (वय २८) गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी त्यानुसार बसचालक संस्कार अनिल भोसले (रा. पांडवनगर, वडकी) याला अटक करण्यात आली आहे. तसेच,शाळेचे संस्थापक संजय वसंत मोडक, मुख्याध्यापिका डॉ. आरती जाधव आणि बस मालक मनीषा संजय मोडक या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं झालं काय ?

रेखा मुलाला शाळेत सोडण्यासाठी पायी जात होत्या. त्याचवेळी सावली होम्स सोसायटीजवळ शाळेची बस मुलांना घेण्यासाठी तिथे आलेली होती. चालक बस मागे घेत असताना रेखा आणि साईनाथ यांना जोरात धडक दिली. स्कूल बसचे चाक साईनाथच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

पुण्यातील मद्यधुंद वाहनचालकाची येरवडा कारागृहात रवानगी

मद्यधुंद अवस्थेत भरधाव चारचाकी चालवून व्हॅले पार्किंग करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला चिरडल्याप्रकरणी वाहनचालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रताप ऊर्फ प्रतापसिंग भारतराव दाईंगडे (वय ४९, रा. धानोरी, मूळ रा. नेरूळ, नवी मुंबई) असे आरोपी वाहनचालकाचे नाव आहे. या अपघातात सतेंद्र मोती मंडल (वय ३०, रा. वडगाव शेरी, मूळ रा. बिहार) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.आरोपीने कुठे मद्यप्राशन केले होते; तसेच त्याने अमली पदार्थाचे सेवन केले होते का, याचा तपास येरवडा पोलिस करत आहेत. ही घटना रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास कल्याणीनगर येथील हॉटेल टॉईटच्या आवारात घडली. आरोपीने जास्त मद्यप्राशन केल्याने तक्रारदारांनी त्याला कॅबने घरी जाण्याची किंवा चालकाची सेवा घेण्याची विनंती केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress Arrested: 'आमच्या कुटुंबाशी तिचा संबंध...'; सुनेच्या अटकेवर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची ठाम प्रतिक्रिया

Kitchen Hacks : फरशीवरील चिकट डाग कसे काढावे? वापरा हे सोपे घरगुती उपाय

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भाजप शिवसेना स्वबळावर लढणार

Pune Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली; १० दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश

Five Rajyog On 2026: 500 वर्षांनी या राशींचं नशीब फळफळणार; 5 राजयोग करणार सर्व इच्छा पूर्ण

SCROLL FOR NEXT