Pune News X
मुंबई/पुणे

Pune News : 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा लिहणं भोवलं, पुण्यातील त्या १९ वर्षीय तरुणीला अटक

Pune Girl Slogan of Pakistan Zindabad : पाकिस्तानचे समर्थन करताना एका १९ वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा लिहून पोस्ट शेअर केली होती. या तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे.

Yash Shirke

अक्षय बडवे, साम टीव्ही, प्रतिनिधी

पाकिस्तान जिंदाबाद या घोषणांमुळे १९ वर्षीय तरुणीवर कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पाकिस्तान समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या या तरुणीला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणांमुळे कोंढवा पोलीस ठाण्यात तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात शिकत असलेल्या एका तरुणीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली होती. यात तिने पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा लिहल्या असल्याची माहिती सकल हिंदू समाज यांनी प्रसिद्ध केली होती. या माहितीमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

याबाबत कोंढवा पोलिसांनी तत्काळ दखल घेतली आणि संबंधित प्रकरणात तरुणीला ताब्यात घेऊन तिच्यावर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी तसेच भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकतेला आणि अखंडतेला धोका निर्माण केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. 'पुणे शहरात कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवतीने सोशल मीडियावर पाकिस्तान जिंदाबाद वगैरे स्वरूपाची पोस्ट केल्याने तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोंढवा पोलीस यांनी तिला अटक केली असून पुढील कारवाई चालू आहे,' असे वक्तव्य राजकुमार शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2025 LIVE Updates : मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

Couple Engagement : लोकप्रिय सिंगर ३५ व्या वर्षी अडकणार लग्न बंधनात; साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर, होणारा नवरा कोण?

Manoj Jarange Patil: आरपारची शेवटची लढाई, आता थांबायचे नाही; मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

Kumbha Rashi : गणेश कृपेने कुंभ राशीचे भाग्य खुलणार, नोकरीत पदोन्नतीची शक्यता

'मुंबईत मला गोळ्या घाला, मी बलिदान द्यायला तयार'; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

SCROLL FOR NEXT