Pune Crime saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime : पुणेकर झोपल्यानंतर गुन्हेगारांचा उच्छाद, मध्यरात्री वाहनांची केली तोडफोड, १३ जणांवर गुन्हा

Pune Wadala Sheri Midnight Rampage : सलग घडणाऱ्या वाहन तोडफोडीने पुणे शहर हे हादरले आहे. यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Saam Tv

पुणे: पुणे शहर आणि वाहनांची तोडफोड हे जणू काही एक समीकरणच झाले आहे. पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याने दहशत माजवली आहे. वडगाव शेरी भागात शनिवारी मध्यरात्री एका टोळक्याने वाहनांची तोडफोड करत संपूर्ण परिसरात दहशत पसरवली. या प्रकरणी चंदन नगर पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, स्थानिक नागरिक हे प्रचंड भयभीत झाले आहे. यावेळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत काही संशयी आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी दिली.

यात्रेच्या वेळी गावगुंडांची दहशत

वडगाव शेरीतील ग्रामदैवताची वार्षिक यात्रा दोन दिवसांपासून होती. यात्रेमध्ये अनेक भाविक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातरेदरम्यान रात्रीच्या वेळी काही हुल्लडबाज जोरजोरात आरडाओरड करत परिसरात दहशत माजवायला लागले. यावेळी ऋषिकेश पवळे यांनी त्यांना हटकरले. त्यामुळे संतप्त झालेल्या गुंडांनी रात्री एकच्या सुमारास कुरकुटे हॉस्पिटलजवळील गल्लीत घुसून शिवीगाळ सुरू केली.

वाहनांची तोडफोड करुन शिवीगाळ

या टोळीच्या हातात लाकडी दांडके होते आणि त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. यामध्ये दोन रिक्षा आणि 10 ते 12 दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेत.यावेळी रहिवाशांनी गोंधळ पाहून घराबाहेर येण्यासही घबरहाट दर्शवली. टोळक्याने वाहनांच्या काचा फोडल्या. तसेच लोकांना शिवीगाळही केली.

स्थानिक नागरिक भयभीत

ही घटना घडल्यानंतर वडगाव शेरीतील लोक हे भयभीत झाले आहे. रात्रीच्या वेळी अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरातील लोकांनी स्वतःची सुरक्षा वाढवावी लागेल अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. चंदननगरच्या अनेक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंद केल्या असून, अशा गावगुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO कर्मचाऱ्यांना लवकरच गुड न्यूज! बेसिक सॅलरी १५००० रुपयांवरुन ₹२५००० होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Lucky zodiac signs: कार्तिक कृष्ण षष्ठीत चार राशींना लाभ; आत्मविश्वास आणि आर्थिक सुधारणा दिसणार

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Crime : धक्कादायक! काँग्रेस नेत्याने पत्नीला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न, महाराष्ट्र हादरला

Mumbai Rent Rules: मुंबईकरांच्या कामाची बातमी! घर भाड्याने देण्यापूर्वी हे काम कराच अन्यथा ₹५००० दंड भरा

SCROLL FOR NEXT