Wardha Crime : संतापजनक! बीफ बिर्याणीची विक्री, पोलिसांनी केला भंडाफोड; 'या' जिल्ह्यात गोरखधंदा सुरु

Wardha Beef Biryani : वर्धेतील काही हॉटेलमध्ये गोमासयुक्त बिर्याणी विकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासणी केलीय. पोलिसांनी चार हॉटेलची तपासणी केलीय.
 beef containing biryani
beef containing biryaniSaamTV
Published On

चेतन व्यास, साम टिव्ही

वर्धा : वर्धा शहरात पोलिसांना काही हॉटेलमध्ये गोमासाची बिर्याणी विकली जातं असल्याची माहिती मिळाली. यावरून वर्धा शहर पोलिसांनी काही हॉटेलची पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम सोबत घेत तपासणी केली. यात पोलिसांना एका हॉटेलमध्ये बिर्याणीमध्ये चक्क गोमास दिलं जात असल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी हॉटेल मालकाला अटक केलीय तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

वर्धेतील काही हॉटेलमध्ये गोमासयुक्त बिर्याणी विकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासणी केलीय. पोलिसांनी चार हॉटेलची तपासणी केलीय. यात इतवारा बाजार येथील एक हॉटेल 'अल बरकत' येथे पोलिसांना पाच किलो गोमासयुक्त बिर्याणी आढळली. पोलिसांनी सदर बिर्याणी जप्त करून तपासणी साठी पाठवली आहे.

 beef containing biryani
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, पुन्हा मोठा राजकीय भूकंप; केंद्रबिंदू गोंदियात

या प्रकरणी हॉटेल मालक कमर अली अमजद अली सय्यद (वय ३७, रा. बोरगाव, मेघे) याला अटक केलीय तर गोमास पुरवणारा फरीद कुरेशीचा पोलीस शोध घेत आहे. एका आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलीय. हे प्रकरण पुढे कुठले नवीन वळण घेते तसेच संबंधित प्रकरणी किती आरोपी पोलिसांच्या गळाला लागतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 beef containing biryani
Maharashtra Politics : 'कोल्डवॉर'वर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांसोबत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com