Pune Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune Fraud: म्हाडाचे घर देण्याचे आमिष दाखवून जोडप्याने अनेकांना घातला लाखोंचा गंडा; पती- पत्नीविरोधात तक्रार दाखल

Pune Fraud By Luring Mhada House: म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने दांपत्याकडून अनेकांची लाखोंची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

Gangappa Pujari

Pune Fraud News:

सध्या सर्व प्रकारचे व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण ऑनलाईन होते. त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकारांमध्येही वाढ झाली आहे. पुणे शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. असेच एक नवीन प्रकरण समोर आले असून म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने दांपत्याकडून अनेकांची लाखोंची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हाडाकडून स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दांपत्याने काही लोकांकडून पैसे उकळून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याबाबत रेखा ऊर्फ कलावती भगवान कांबळे आणि तिचा पती भगवान कांबळे (रा. न्यू म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

रेखा आणि तिच्या पतीने आपण म्हाडामध्ये कार्यरत असून, पुनर्वसनामधील घर स्वस्तात मिळवून देतो म्हणत लोकांना मोबाईलवर म्हाडाची घरे दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी घराच्या बुकिंगसाठी अगोदर १६ हजार रुपये द्यावे लागतील. घर मिळाल्यानंतर म्हाडामध्ये डिमांड ड्राफ्ट काढून पैसे भरावे लागतील. पैसे भरल्याशिवाय घराची चावी मिळत नाही, असे सांगून त्यांना न्यू म्हाडा कॉलनीतील घरे लांबूनच दाखवली.

रेखा कांबळे हिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी १६ हजार रुपये दिले. त्यानंतर काही महिने उलटून गेले. घराबाबत चौकशी केली असता रेखाने तुम्हाला घर मिळणार नाही. तसेच, स्वत: जिवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली. तसेच, पतीने गुंडामार्फत मारहाण करण्याची धमकी दिली. या दांपत्याने अशा प्रकारे आतापर्यंत २५ ते ३० नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone Scam: मोबाइल फोन सारखा ट्रिंग ट्रिंग करतोय, मोठा फ्रॉड होण्याचा धोका, हे 5 संकेत आधीच ओळखा

Dhurandhar Cast Net Worth: रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त, जाणून घ्या कोणता धुरंधर आहे सर्वात श्रीमंत

Maharashtra Live News Update: मुंबई नाशिक महामार्गावर दोन बाईक अपघातात कल्याण डोंबिवली येथील नवरा बायकोचा जागीच मृत्यू

Kitchen Hacks : भांडी धुतल्यानंतर ही भांड्यांना दुर्गंधी येते? मग हि सोपी ट्रिक करा फोलो

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT