- अजय सोनवणे
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये कांदा उत्पादक महिलेच्या खात्यात चुकून जमा झालेले १ लाख ७६ हजार रुपये त्यांनी ज्यांच्या खात्यातून पैसे आले त्या महिलेला पुन्हा परत केले. या कृतीमुळे आजही माणुसकी आणि प्रामाणिकपणा टिकून असल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यात सुरु आहे. (Maharashtra News)
लासलगाव येथिल कमल सोनवणे यांच्या प्रॉव्हिडंटचे पैसे जमा करतांना बँकेकडून चकून खात्याचा शेवटचा नंबर चूकल्याने ते पैसे कांदा (onion) उत्पादक शेतकरी निर्मला कदम यांच्या खात्यात जमा झाले. कांद्याचे अनुदान जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी कदम बँकेत गेल्या असता त्यांच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
ही रक्कम कुठून जमा झाली याचा शोध घेतल्यानंतर सर्व प्रकार समोर आला. ज्यांची रक्कम होती त्या कमल सोनवणे यांच्याशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगण्यात आला. त्यानंतर साेनवणे यांना त्यांना सर्व रकमेचा चेक निर्माला कदम या शेतकरी महिलेने त्यांना पुन्हा परत केला.
एकीकडे कांद्याला भाव नाही अशा परिस्थितीत कांदा उत्पादक हवालदिल झालेला असतांना कांदा उत्पादक महिलेच्या खात्यात पडलेली रक्कम प्रमाणिकपणे संबंधित महिलेला दिल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.