Pune Ex Mayor Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: गंभीर विषयावर बैठक, माजी महापौर गेम खेळण्यात दंग; VIDEO व्हायरल; नागरिक संतापले

Pune Ex Mayor Video: पुण्यातील माजी महौपार सिद्धार्थ धेंडे चर्चेत आले आहेत. एका महत्वाच्या बैठकीमध्ये सिद्धार्थ धेंडे हे मोबाईलमध्ये गेम खेळण्यात दंग असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यातील आंबेडकर स्मारकाबाबतच्या बैठकीत माजी महापौर गेम खेळताना व्हिडीओ व्हायरल.

  • सिद्धार्थ धेंडे यांच्या वागण्यावर आंबेडकरी समाजाचा संताप.

  • बैठकीतील गंभीर चर्चेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप.

  • सोशल मीडियावर व्हिडीओवर जोरदार चर्चा.

सागर आव्हाड, पुणे

राज्याचे माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेतील सभागृहामध्ये रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. या घटनेनंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केल जात होती. पण सरकारकडून त्यांच्या खात्यात बदल करून त्यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. पुण्यात माजी महापौर एका महत्वाच्या बैठकीमध्ये गेम खेळत असल्याचे दिसून आले. त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पुण्याचे माजी महापौर आणि माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांचा गेम खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आंबेडकर स्मारकाबाबत महत्वाची बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये चर्चा सुरू असताना सिद्धार्थ धेंडे मात्र गेम खेळण्यात दंग होते. त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आंबेडकरी समाजात तीव्र नाराजीची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता पुणे जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा मिळावी या मागणीसाठी होणाऱ्या या आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर बैठका आयोजित केल्या जात आहेत. अशाच एका बैठकीत पुण्यातील बुध्द विहारात गंभीर चर्चा सुरू असताना वरिष्ठ नेता सिद्धार्थ धेंडे हे मोबाईलवर गेम खेळताना दिसून आले. सगळे बैठकीतील चर्चा ऐकत असताना ते मात्र गेम खेळत होते.

या घटनेमुळे उपस्थितांमध्ये तसेच आंबेडकरी समाजात मोठा रोष निर्माण झाला आहे. नेत्यांनीच बैठकीचे गांभीर्य न ठेवणे आणि जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे, हा प्रकार निषेधार्ह असल्याचे आंबेडकरी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 'नेत्यांच्या अशा निष्काळजी वृत्तीमुळेच जनतेला रस्त्यावर उतरावे लागते.', असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. सध्या या व्हिडीओची पुण्यात जोरदार चर्चा होत आहे.

माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे. धेंडे यांनी सांगितले की, 'या बैठकीमध्ये सर्वांची भाषणे सुरू होती. समारंभ सुरू असताना नुकताच मोबाईल हाती घेतला आणि नेमका त्याच वेळी कोणीतरी हा व्हिडिओ काढला. माझ्या कृतीमुळे समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मला माझ्या समाजाची माफी मागायला अजिबात कमीपणा वाटत नाही. विरोधक जाणूनबुजून सुपारी घेऊन समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र समाजामध्ये कोणतीही दरी निर्माण होणार नाही. उलट आणखी जोमाने आम्ही समाजासाठी काम करू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जागा हक्काने ताब्यात घेऊ.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी, बांगलादेशाने आयात बंदी हटवली

Banana Mask: केसांच्या वाढीसाठी 'असा' करा केळीच्या सालीचा वापर, वाचा हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत

Voter List Scam : हा तर मोठा घोटाळा! मतदार यादीत एकाच महिलेचं ६३ वेळा नाव; कुठे झाला घोळ?

Mumbai Dabbawala: डबेवाल्यांना मुंबईत मिळणार ५०० स्क्वेअर फुटाचं घर

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सैनिकांना सन्मान, १६ बीएसएफ जवांनाना शौर्य पुरस्कार प्रदान

SCROLL FOR NEXT