Poha Chakali Recipe : वाटीभर पोह्यांची करा कुरकुरीत चकली, १५ मिनिटांत चटपटीत स्नॅक्स तयार

Shreya Maskar

संध्याकाळचा नाश्ता

हिवाळ्यात तुम्हाला काही चटपटीत आणि कुरकुरीत खावेसे वाटत असेल तर, पोह्यांची चकली बेस्ट ऑप्शन आहे. अवघ्या १५ मिनिटांत पदार्थ तयार होईल.

Poha Chakali | yandex

पोह्यांची चकली

पोह्यांची चकली बनवण्यासाठी पोहे आणि चण्याची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवून घ्या. जास्त पीठ जाड ठेवू नका.

Poha Chakali | yandex

तांदळाचे पीठ

एका मोठ्या परातीत पोहे आणि चण्याचे पीठ, तांदळाचे पीठ टाकून चांगले मिक्स करा. तुम्ही यात थोडा रवा देखील टाकू शकता.

Rice Flour | yandex

तीळ

तयार केलेल्या पीठात तीळ, ओवा, लाल तिखट, हळद, हिंग आणि मीठ घालून सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्या. जेणेकरून चकली आणखी कुरकुरीत होईल.

Sesame Seeds | yandex

तूप

पॅनमध्ये तूप गरम करून पीठामध्ये तुपाचे मोहन ओता. आता थोडं थोडं गरम पाणी टाकून कणिक चांगली मळून घ्या. जेणेकरून पीठ मऊ होईल.

Ghee | yandex

मऊ पीठ मळा

पीठ खूपच घट्ट किंवा खूपच सैल नसावे. चकलीसाठी पीठ थोडे मऊ मळा. मळलेले पीठ १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा.

Poha Chakali | yandex

चकलीचे पीठ

प्लास्टिक पेपरवर कोरडे पीठ टाका. तसेच चकलीच्या भांड्यात चकलीचे पीठ भरून पेपरवर चकली पाडून घ्या. चकल्या थोड्या छोट्या करा, म्हणजे त्या चांगल्या तळल्या जातील.

Poha Chakali | yandex

तेलात तळा

पॅनमध्ये तेल गरम करून तुम्ही पोह्यांची चकली मंद आचेवर तळून घ्या. तयार चकली कुरकुरीत राहण्यासाठी तिला हवाबंद डब्यात ठेवून द्या. जेमेकरून ती नरम होणार नाही.

Poha Chakali | yandex

NEXT : ढाबा स्टाइल फ्लॉवर बटाट्याची चमचमीत भाजी, अवघ्या १० मिनिटांत मुलं जेवण करतील फस्त

Cauliflower Potato Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा...