Shreya Maskar
सकाळी मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक फ्लॉवर बटाट्याची भाजी आणि चपाती द्या. हिवाळ्यात फ्लॉवर बाजारात पाहायला मिळतो.
फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी फ्लॉवर, बटाटा, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, मीठ, धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, हिंग आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून यात हिंग , हिरवी मिरची, जिरे टाकून फोडणी तडतडू द्या.
भाजीत बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो टाकून व्यवस्थित मिक्स करा. भाजीला तेल सुटू द्या.
कांदा गोल्डन फ्राय झाला की यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे पावडर सर्व मसाले टाकून मिक्स करून घ्या.
आता भाजीमध्ये चिरलेले बटाटे आणि फ्लॉवर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. फ्लॉवरची बारीक फुल काढून घ्या. जेणेकरून मुल आवडीने खातील.
१० - १५ मिनिटे फ्लॉवर बटाट्याची भाजी शिजू द्या. त्यानंतर गरमागरम चपातीसोबत भाजीचा आस्वाद घ्या.
तुम्हाला पाहिजे असेल तर यात तुम्ही शेंगदाण्याचा कूट देखील टाकू शकता. जेणेकरून भाजीची चव आणखी वाढेल.