Shreya Maskar
थकून भागून घरी आल्यावर फक्त ५ मिनिटांत रगडा चाट बनवा आणि पोट भरा. ही खूप चटपटीत रेसिपी आहे.
रगडा चाट बनवण्यासाठी पांढरे वाटाणे, बटाटे, मीठ, पाणी, हिंग, लसूण, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, धणे पूड, आमचूर पावडर, कोथिंबीर आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
रगडा चाट बनवण्यासाठी पांढरे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. तुम्ही यात मूग देखील टाकू शकता.
सकाळी कुकरला पांढरे वाटाणे, बटाटे, चवीनुसार मीठ, पाणी टाकून चांगले उकडून घ्या. त्यानंतर हे सर्व पदार्थ चांगले मॅश करा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, लसूण, आले आणि हिरवी मिरची घालून भाजून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा.
यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो , लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, धणे पूड , आमचूर पावडर आणि मॅश केलेले सर्व वाटाण्याचे मिश्रण टाका.
शेवटी एका बाऊलमध्ये रगडा काढून त्यात पुरी, शेव, चाटमधील तुमचे आवडते पदार्थ टाकून चांगले मिक्स करा. उदा चणे, शेंगदाणे, फरसाण
तुम्ही एका बाऊलमध्ये तयार रगडा टाका आणि त्यावर लिंबू पिळा. तसेच पुदिना किंवा कोथिंबीर भुरभुरवा.