Tilgul Poli Recipe : मकर संक्रांतीला फक्त १० मिनिटांत बनवा मऊसूत 'तीळ गुळाची पोळी', वाचा पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

मकर संक्रांत

मकर संक्रांतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी तीळगूळपासून अनेक पदार्थ बनवले जातात. तुम्ही लाडूसोबत मऊसूत तीळ गुळाची पोळी बनवा.

Tilgul Poli

तीळ गुळाची पोळी

तीळ गुळाची पोळी बनवण्यासाठी तीळ, शेंगदाणे, गूळ, मैदा, सुके किसलेले खोबरे, जायफळ, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर हे साहित्य लागेल.

Tilgul Poli

तीळ

तीळ गुळाची पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम तीळ, शेंगदाणे, गूळ, सुके किसलेले खोबरे, जायफळ आणि वेलची पावडर सगळे पदार्थ एकत्र करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

Sesame Seeds

मैद्याचे पीठ

एका परातीत मैद्याचे पीठ, पाणी आणि तूप टाकून कणिक चांगली मळून घ्या. तयार कणिक मऊ होण्यासाठी १५-२० मिनिटे बाजूला ठेवून द्या.

Tilgul Poli | Tilgul Poli

पोळी भाजा

मैद्याच्या पिठाचा गोळा करून एक पुरी लाटून घ्या. यात मिक्सरमधून काढलेले तिळाचे मिश्रण टाकून तीळ गुळाची पोळी लाटून घ्या.

Tilgul Poli | Tilgul Poli

तूप

पॅनमध्ये तूप टाकून तीळ गुळाची पोळी खरपूस भाजून घ्या. त्यानंतर तीळ गुळाची पोळी दूध किंवा तुपासोबत खा.

Ghee | Tilgul Poli

ड्रायफ्रूट्स

तुम्ही यात तुमच्या आवडत्या ड्रायफ्रूट्सची पावडर देखील टाकू शकता. यामुळे तीळ गुळाची पोळी अधिक पौष्टिक होते. लहान मुलांना खूप आवडेल.

Dry Fruits | Tilgul Poli

उत्सव

मकर संक्रांतीला पतंग उत्सवाचा आनंद घ्या. लहान मुलांचा हा आवडता सण आहे. उंच आकाशात येथे पतंग उडताना पाहायला मिळतात.

Tilgul Poli | Tilgul Poli

NEXT : खोकल्याने हैराण झालात? आजीच्या बटव्यातील 'ही' रेसिपी देईल त्वरित आराम

Ayurvedic Kadha Recipe | yandex
येथे क्लिक करा...