Shreya Maskar
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे अनेकांना सर्दी-खोकल्याचा जास्त त्रास होतो. ज्यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती कमी होते. सर्दी-खोकला काही मिनिटांत बरा करण्यासाठी आवर्जून आळशी-धण्याचा काढा प्या.
आळशी-धण्याचा काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये पाणी टाकून आळशी, जिरे आणि धणे मिक्स करून उकळवायला ठेवा. जेणेकरून पोषण घटक पाण्यात येतील.
एक उकळी आल्यावर यात साखर किंवा गूळ मिक्स करा. पाणी उकळून अर्धे होईपर्यंत काढा ढवळत रहा. त्यानंतर एका बाऊलमध्ये काढून याचा आस्वाद घ्या.
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महिन्यातून ४-५ वेळा काढा प्यावा. थंडीत तर हा काढा आवर्जून प्यावा. आळशी-धण्याचा काढ्यात असलेल्या ओमेगा-३ मुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.
तुम्ही यात तुळस, लवंग, मिरपूड देखील घालू शकता. हा काढा सकाळी रिकाम्या पोटी प्यावा. जेणेकरून दिवसभर तुम्हाला उत्साही वाटेल.
आळशी-धण्याचा काढा प्यायल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच आपले हृदय देखील निरोगी राहते.
बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांसाठीआळशी-धण्याचा काढा उपयुक्त आहे. कारण यात भरपूर प्रमाणात फायबर असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.