Shreya Maskar
अळीवची खीर बनवण्यासाठी अळीवाच्या बिया, दूध, साखर, वेलची पावडर, तूप, सुका मेवा इत्यादी साहित्य लागते. तुम्हाला आवडत असेल तर यात थोडे केशन देखील टाकू शकता.
अळीवची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यात सुका मेवा चांगला भाजून घ्या. यात काजू, बदाम आणि पिस्ता यांचा समावेश करा.
आता दुसऱ्या पॅनमध्ये पाणी घालून २ ते ३ चमचा अळीवाच्या बिया टाकून व्यवस्थित उकळी काढा. गॅस मध्यम आचेवर ठेवून द्या.
अळीवाच्या बिया शिजल्यानंतर त्यात साखर घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तुम्ही यात साखरेऐवजी गूळ देखील टाकू शकता.
साखर वितळल्यावर त्यात भाजून घेतलेला सुका मेवा घालून व्यवस्थित मिक्स करा. यामुळे खीर अधिक पौष्टिक बनते.
खीरमध्ये हळूहळू दूध मिक्स करून चमच्याने सतत ढवळत राहा. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.
मिश्रणाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि वेलची पावडर, तूप घालून ढवळून घ्या. अशाप्रकारे अळीवची खीर तयार झाली.
तुम्हाला थंड खीर खायची असल्यास फ्रिजमध्ये १-२ तास ठेवून द्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये खीर काढून त्याचा आस्वाद घ्या.