Shreya Maskar
रविवारी खास पावभाजी बिर्याणी बनवा. हा चटपटीत पदार्थ तुमच्या मुलांना खूप आवडेल. तसेच बनवायला देखील सिंपल आहे.
पावभाजी बिर्याणी बनवण्यासाठी शिजवलेला भात, शिजवून मॅश केलेली पावभाजी, पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद, आलं-लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, बटर, तेल, कोथिंबीर, पुदीना इत्यादी साहित्य लागते.
पावभाजी बिर्याणी बनवण्यासाठी सर्वप्रथम चटपटीत ढाबा स्टाइल पावभाजी बनवून घ्या. यात भरपूर कोथिंबीर आणि बटर टाका. जेणेकरून चव आणखी वाढेल.
आता कुकरमध्ये बटर टाकून त्यात कांदा गोल्डन फ्राय करून घ्या. मग यात आलं-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत चांगले परता.
भातामध्ये पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद घालून मिक्स करा. जेणेकरून राइस मस्त तिखट होईल. तुम्ही यात तुमच्या आवडीचे पदार्थ देखील टाकू शकता.
शेवटी कुकरमध्ये मॅश केलेली पावभाजी आणि शिजवलेला बासमती भात टाका. हे चांगले एकजीव करून घ्या. त्यानंतर यात तळलेले काजू देखील टाका.
आता मंद आचेवर ५-१० मिनिटे बिर्याणीला दम द्या. अशाप्रकारे पावभाजी बिर्याणी तयार झाली. हा पदार्थ फक्त १० मिनिटांत तयार होतो. ही हटके रेसिपी तुमच्या मुलांना खूप आवडेल.
शेवटी यात हिरवीगार कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने टाकून गरमागरम पावभाजी बिर्याणीचा आस्वाद घ्या.