Tilachi Vadi Recipe : मकर संक्रांतीला खास बनवा तिळाच्या वड्या, वाचा इंस्टंट रेसिपी

Shreya Maskar

मकर संक्रांत

मकर संक्रांतीला खास तिळाच्या वड्या बनवा. हा पदार्थ बनवायला अगदी सिंपल आणि खायला टेस्टी आहे. लहान मुलांना खूप आवडेल.

Tilachi Vadi | yandex

तिळाच्या वड्या

तिळाच्या वड्या बनवण्यासाठी तीळ, गूळ, साजूक तूप, शेंगदाण्याचा कुट, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुम्हाला आवडत असेल तर गुलाबाच्या पाकळ्या टाकू शकता.

Tilachi Vadi | yandex

तीळ

तिळाच्या वड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये तीळ गरम करून मंद आचेवर गोल्डन फ्राय करा. तीळ जळणार नाही, याची काळजी घ्या.

Tilachi Vadi | yandex

तीळ थंड करा

तीळ २ ते ३ मिनिटे भाजून झाल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्या. जेणेकरून वड्या जास्त कडक आणि चिकट होणार नाही.

Tilachi Vadi | yandex

गूळ

दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेला गूळ घाला. हा गूळ चमच्याने सतत ढवळत राहा याचा पातळसर पाक तयार करून घ्यावा. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.

Jaggery | yandex

शेंगदाण्याचा कुट

पाक तयार झाल्यावर यात भाजलेले तीळ, भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट आणि वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता गॅस बंद करा.

Peanut | yandex

तिळाच्या वडी

एका ताटाला तूप लावून त्यात तिळाच्या वडीचे तयार मिश्रण ओतून समान पसरवून घ्या. त्यानंतर सुरीच्या मदतीने सुंदर वड्या पाडून घ्या.

Tilachi Vadi | yandex

तिळाच्या वड्या सेट करा

तिळाच्या वड्या सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ५-६ तास ठे‌वून द्या. थंडाव्यामुळे त्या लवकर घट्ट होतात. त्यानंतर एका हवाबंद डब्यात तिळाच्या वड्या स्टोर करून ठेवा.

Tilachi Vadi | yandex

NEXT :  गावाकडे बनवतात अगदी 'तशी' तुरीच्या दाण्याची भाजी, वाचा सिंपल रेसिपी

Turichya Danyachi Bhaji Recipe | yandex
येथे क्लिक करा...