Shreya Maskar
हिवाळ्यात आपण हिरव्या भाज्या विशेष खाव्या, यात पौष्टिक घटक असतात. त्यामुळे गावाकडे बनवतात तशी तुरीच्या दाण्याची भाजी आवर्जून बनवा.
तुरीच्या दाण्याची भाजी बनवण्यासाठी ओले तुरीचे दाणे, कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, जिरे-मोहरी, मीठ, तेल, कोथिंबीर आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
तुरीच्या दाण्याची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे टाकून तडतडू द्या.
त्यानंतर यात बारीक चिरलेला कांदा घालून परता. नंतर मिश्रणात टोमॅटो आणि आले-लसूण पेस्ट मिक्स करून गोल्डन फ्राय करून घ्या.
भाजीमध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड घालून चांगले मिक्स करा. तुम्हाला आवडत असलेले पदार्थ तुम्ही यात टाकू शकता.
त्यानंतर भाजीमध्ये स्वच्छ धुतलेले ओले तुरीचे दाणे घालून २-३ मिनिटे परतून घ्या. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दाणे कुकरमध्ये उकडवू शकता.
त्यानंतर भाजीत गरजेनुसार गरम पाणी आणि चवीनुसार मीठ घालून एक उकळी काढून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा. जेणेकरून भाजी चांगली शिजेल.
शेवटी भाजीत कोथिंबीर घालून गरमागरम पोळी, भाकरीसोबत तुम्ही तुरीच्या दाण्याची भाजीचा आस्वाद घ्या. तुम्ही भातासोबत देखील हा पदार्थ खाऊ शकता.