Shreya Maskar
गाजराची बर्फी बनवण्यासाठी गाजर, साखर, रवा, मिल्क पावडर, वेलची पूड, दूध, सुकामेवा, तूप इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता.
गाजर बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. जेणेकरून तुम्हाला स्वच्छ गाजर मिळतील. तसेच ते चांगले शिजतील.
पॅनमध्ये तूप गरम करून रवा मंद आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या. तुम्ही यासाठी बारीक रव्याचा वापर करा.
धुतलेला गाजर मस्त किसून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. यात तुम्ही थोडे दूध टाकू शकता. तुम्ही बर्फी बनवण्यासाठी लाल गाजरांचा वापर करा.
त्यानंतर पॅनमध्ये तूप टाकून यात गाजराचा किस 5-10 मिनिटे परतून घ्या. यामध्ये कोमट दूध टाकून आटेपर्यंत शिजू द्या.
यात साखर घालून ती चांगली विरघळू दे. त्यानंतर यात भाजलेला रवा, मिल्क पावडर घालून मिक्स करा.
शेवटी गॅस बंद करून मिश्रणात वेलची पूड टाका. एका मोठ्या ताटाला तूप लावून सर्व मिश्रण त्यात पसरवून घ्या. सर्व मिश्रण ताटात समान पसरवा.
यावर ड्रायफ्रूट्स काप टाकून त्याचे बर्फीचे चौकोनी काप करा. त्यानंतर ताट फ्रिजमध्ये 5-6 तास सेट करायला ठेवा. यामुळे बर्फी चांगली सेट होते.