Matar Upma Recipe : लहान मुलांसाठी हेल्दी नाश्ता, वाटीभर हिरव्या मटारपासून बनवा चटपटीत उपमा

Shreya Maskar

मटार उपमा

मटार उपमा बनवण्यासाठी रवा, मटार, कांदा, हिरवी मिरची, आले, मोहरी, जिरे, कढीपत्ता, तेल, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात शेंगदाणे देखील टाकू शकाता.

Matar Upma | yandex

रवा

मटार उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये रवा मंद आचेवर गोल्डन फ्राय भाजून घ्या. तुम्ही यासाठी बारीक रव्याचा वापर करा.

Semolina | yandex

हिरवी मिरची

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात तूप, मोहरी, जिरे,कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आले घालून परतून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवा.

Green Chili | yandex

कांदा

मिश्रणात चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परता. त्यानंतर यात मटार घालून २-३ मिनिटे परता. मिश्रणात रवा आणि पाणी टाकून एकजीव करा.

Onion | yandex

चवीनुसार मीठ

मटार उपमा घट्ट झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घाला आणि उपमा सतत ढवळत रहा, जेणेकरून गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या.

Salt | yandex

कोथिंबीर

५ मिनिटे मटार उपमा शिजवा. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा. तुम्ही हा पदार्थ मुलांना सकाळी नाश्त्याला द्या, यामुळे त्यांचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील.

Coriander | yandex

टीप

मटार उपमा मऊ आणि मोकळा हवा असेल तर यात गरम पाणी टाका. म्हणजे तो चांगला फुलतो.

Matar Upma | yandex

आवडीचे पदार्थ

मटार उपम्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही यात गाजर, मका किंवा इतर भाज्या देखील घालू शकता. फक्त हे सर्व पदार्थ थोडे शिजवून उपम्यात टाका.

Matar Upma | yandex

NEXT : गरमागरम चहा अन् कुरकुरीत पालक भजी, पावसाळ्यात चटपटीत नाश्ता

Palak Pakoda Recipe | yandex
येथे क्लिक करा...