Pune Air Tickets Expensive Saam Tv
मुंबई/पुणे

Flight Ticket: सलग सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला, तिकीटासाठी दुप्पट खर्च; गोवा- चेन्नईसाठी किती पैसे मोजावे लागणार?

Pune Air Tickets Expensive: सलग ३ दिवस सुट्टी आल्यामुळे विमान तिकिटाचे दर वाढले आहेत. पुण्यावरून गोवा, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई या ठिकाणी जाणाऱ्यासाठी दुप्पट ते तिप्पट पैसे मोजावे लागत आहेत. कुठे जाण्यासाठी किती तिकीटाचे दर वाचा सविस्तर...

Priya More

Summary -

  • सलग सुट्ट्यांमुळे पुण्यात विमान तिकीटांचे दर दुप्पट-तिप्पट झाले.

  • गोवा तिकीट ११,००० रुपये आणि चेन्नई तिकीट तब्बल ५०,००० रुपये.

  • फिरायला निघालेल्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण.

  • विमानांची संख्या मर्यादित असल्याने दरवाढ करण्यात आली.

सागर आव्हाड, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणेकरांचा विमान प्रवास महागला आहे. सलग सुट्ट्या आल्यामुळे विमान तिकीटाचे दर दुप्पटीने आणि तिप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागत आहे. तिकिटाचे दर वाढल्यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. गोव्याला जाण्यासाठी ११ हजार, चेन्नईला जाण्यासाठी ५० हजार रुपये मोजावे लागत आहेत. पुण्यावरून इतर ठिकाणी विमानाने जाण्यासाठी किती खर्च करावा लागणार हे घ्या जाणून...

शुक्रवारी १५ ऑगस्टची शासकीय सुट्टी आहे. तर १६ आणि १७ ऑगस्टच्या विकेंडमुळे सलग तीन दिवस सुट्टी मिळत आहे. या सुट्टीला फिरायला जाण्याचा बेत अनेकांनी आखला असल्याने विमानांच्या तिकीट दरात मोठी वाढ झाली आहे. पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी ११ हजार रुपये तर चेन्नईला जाण्यासाठी एका विमान कंपनीने ५० हजार रुपये तिकीट दर आकारले आहेत. फिरायला जाणाऱ्यांची गर्दी देखील वाढली असली तरी देखील पर्यटकांनी तिकीट दर वाढवल्यामुळे नाराजी व्यक्त केली.

सलग ३ दिवस सुट्टीचे नियोजन केल्याने अनेकांनी शुक्रवारीच सायंकाळच्या विमानाने इच्छित स्थळी जाण्यासाठी नियोजन केले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून वेगवेगळ्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी विमानांच्या तिकीट दरात मोठी वाढ पाहण्यास मिळत आहे. काही विमान कंपन्यांकडे विमानांची असलेली कमतरता यामुळे विमानांच्या तिकीट दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. शिवाय सुट्टीच्या काळात प्रवाशांची संख्या अधिक आहे मात्र विमानांची संख्या मर्यादित असल्याने विमान कंपन्यांना ही दरवाढ करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.

विमान तिकाटांचे दर किती?

पुणे ते गोवा - ११ हजार

पुणे ते दिल्ली - १६ हजार

पुणे ते कोलकत्ता - ९ हजार

पुणे ते बंगळूरू - १५ हजार

पुणे ते हैदराबाद - १२ हजार

पुणे ते चेन्नई - ५० हजार

पुणे ते कोची - १० हजार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narendra Patil Accident: फडणवीसांच्या ताफ्यातील ड्रायव्हरनं कार अचानक पुढे घेतली; भाजप नेता थेट जमिनीवर आपटला|VIDEO

Mangalore Fort History: मंगरूळगड तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या इतिहास आणि किल्ल्याची वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: नाशिकच्या वडनेर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात २ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

कल्याणचा स्कायवॉक नेमका कुणासाठी? फेरीवाले, गर्दुल्ले अन् वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा वावर; नागरिक संतापले

Shocking : अजबच! तरुणाच्या पोटात २९ स्टीलचे चमचे आणि १९ टूथब्रश, ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनाही बसला धक्का

SCROLL FOR NEXT