Pune: पोलिस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी, हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले; CCTV VIDEO व्हायरल

Pune PSI VIDEO: पुण्यामध्ये पोलिस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी समोर आली आहे. एका हॉटेल व्यवसायिकाला धमकावत या पोलिसाने पैसे उकळल्याचा आरोप केला जात आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Pune: पोलिस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी, हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले; CCTV व्हिडीओ व्हायरल
Pune PSI VIDEO Saam Tv
Published On

Summary -

  • खराडी पोलिस PSI वर हॉटेल चालकाकडून लाच मागितल्याचा आरोप.

  • घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल होतोय.

  • पोलिस आयुक्तांच्या नियमावलीला धाब्यावर बसवून कारवाई.

  • घटनेनंतर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह.

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने हॉटेल चालकाकडून कारवाईच्या धाकाने पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. खरं तर नियमानुसार हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री दिड वाजेपर्यंत परवानगी आहे. असे असताना देखील हे पोलिस उपनिरीक्षक रात्री सव्वा बारा वाजता हॉटेलमध्ये घुसून जेवण करत असलेल्या ग्राहकाचे व्हिडिओ चित्रीकरण करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेल व्यावसायिकाला पोलिस ठाण्यात बोलावून तुम्ही माझे काम केले तर मी तुमचे काम करतो असे म्हणत पैशाची मागणी करून रात्री साडेआठ वाजता ते स्वीकारतात.

दरम्यान यांबाबत खराडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी सांगितले की, आस्थापना बंद करण्याचे निर्धारीत वेळेचे नियम आहेत. हॉटेल रेस्टॉरंटला दिड वाजेपर्यंत परवानगी आहे. जे अधिकारी मिकाची क्लबमध्ये रात्री सव्वा बारा वाजता गेल्याचे समजते आहे. त्यांना आम्ही हॉटेल बंद करण्याबाबत सांगितले नव्हते. या प्रकाराची आम्ही माहिती घेतो.

Pune: पोलिस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी, हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले; CCTV व्हिडीओ व्हायरल
Pune News:पुण्यातील वाहतूक कोंडी काही सुटेना; नागरीक त्रस्त, प्रशासन मात्र सुस्त|VIDEO

तर दुसरीकडे पोलिस आयुक्तांनी हॉटेल संदर्भात काढलेली नियमावली आणि शहरातील आस्थापनांचा कालावधी याचा कदाचीत विसर पडला असावा. आयुक्त साहेबांनी काढलेली नियमावली सांगते, मनोरंजनासाठी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या ग्राहकांना त्रास नको अपवादात्मक परिस्थिती सोडता, पोलिस सतत आस्थापनामध्ये प्रवेश करणार नाहीत. नियमभंग केल्याची कारवाई करायचे झाल्यास पोलिस मॅनेजरला बाहेर बोलावून घेतील. त्यानंंतर दीड वाजताची आस्थापना बंद करण्याची वेळ झाल्यानंतर करवाई करतील. त्याचबरोबर आस्थापनांना बंद करण्याचा कालावधी याचे स्पष्ट निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावलीत दिले आहेत.

Pune: पोलिस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी, हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले; CCTV व्हिडीओ व्हायरल
Pune: पुण्यात भररस्त्यात ट्रॅफिक पोलिस आणि कॅब चालकाचा राडा, शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

फौजदारसाहेब हॉटेलमध्ये शिरून रात्री सव्वा बारा वाजताच हॉटेल बंद करण्यास सांगत असलेले आणि मोबाईलमध्ये चित्रीकरण करत असल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. तसेच त्यांनी दुसर्‍या दिवशी हॉटेल मॅनेजर आणि मालकाला देखील फोन केल्याचे समोर आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट व्यवसायिकांकडून जर नियमांचे उल्लंघन होत असलेल तर त्यांच्यावर कारवाई होणे जरजेचेच आहे. परंतू केवळ कारवाई करण्याच्या धाकाने जर काही पोलिस अधिकारी आपले आर्थिक हेतू साध्य करून पाहत असतील तर हे नक्कीच पोलिसांच्या प्रतिमेला शोभणारे नसल्याचे बोलले जाते.

Pune: पोलिस उपनिरीक्षकाची हप्तेखोरी, हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले; CCTV व्हिडीओ व्हायरल
Pune Crime: पैशांची मागणी, वारंवार शिवीगाळ; तरुणीचं डोकं फिरलं, रॉडने मारहाण करत तरुणाला संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com