Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

Mumbai Metro 7A Dahisar to Airport: दहिसर ते आंतरराष्ट्रीय विमानतळ अंतरचा प्रवास ५० मिनिटात पूर्ण होणार आहे. मुंबई मेट्रो रेड लाईनमुळे तुमचा दहिसर-सीएसएमआयए मेट्रो ७ए प्रवास कसा असेल? लाईन कधी तयार होईल? अशी प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.
Mumbai Metro7A
Mumbai Metro 7A Dahisar to Airportsaam tv
Published On
Summary
  • मुंबई मेट्रो ७ए दहिसरपासून थेट आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ पर्यंत धावणार.

  • प्रवासाचा वेळ फक्त ५० मिनिटांवर येणार.

  • वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ट्रॅफिक समस्येवर तोडगा.

  • प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ.

मुंबईत हळूहळू मेट्रोचं जाळं पसरू लागलंय. मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर आणि जलद झालाय. मुंबईमधील लोकांचे जीवन घड्याळ्याच्या काटेवर धावणारे असते. पाच मिनिट उशिर झाला तर अख्या दिवसाचं वेळापत्रक कोलमडत असतं. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद बनण्यासाठी मुंबई मेट्रो मोलाचा वाटा उचलत आहे. (Mumbai Metro 7A route map, station list, ticket fare, and timings)

वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरील वाहतुकीमुळे हैरान झालेल्या मुंबईकरांचा दहिसर ते विमानतळापर्यंतचा प्रवास जलद होणार आहे. मुंबई मेट्रो-७अ विस्तार होणार असून ही मेट्रो आता थेट आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ पर्यंत धावणार आहे. तुमचा प्रवास कसा असेल? ही लाईन कधी तयार होईल? ती इतर लाईन्स आणि सार्वजनिक वाहतुकीशी जोडली जाईल का? असे प्रश्न मुंबई मेट्रो-७ए बद्दल तुमच्या मनात आले असतील. तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत.

रेड लाईनवरील मेट्रो ७ ए चा विस्तार गुंडवली (अंधेरी पूर्व) ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) टर्मिनल2 पर्यंत असेल. तर या मार्गाचा अंतर हे ३.४२ किलोमीटर असणार आहे. ०.९४ किमी अंतरचा मार्ग हा पश्चिम द्रुतगती महामार्गावरून असणार आहे. तर २.११ किमी अंतरचा मार्ग हा भूमिगत असून तो सहर उन्नत रस्त्याखालून जाईल. या मार्गात फक्त दोन स्टेशन असणार आहेत. एक एअरपोर्ट कॉलनी आणि दुसरं स्टेशन हे CSMIA Terminal 2 असेल.

दहिसर ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या प्रवासाचे ४० मिनिटे वाचणार आहे. या मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास जलद होणार आहे. सध्या दहिसर ते विमानतळापर्यंतचा प्रवास रस्त्यावरून करत असाल तर तुम्हाला या प्रवासासाठी ९० मिनिटे लागतात. परंतु मेट्रो ७ अ कार्यान्वित होईल तेव्हा प्रवासाचे ४० मिनिटे वाचणार आहेत. दरम्यान मुंबई मेट्रो ७अ चे काम जुलै २०२५ पर्यंत ६१% पूर्ण झाले आहे. तर डिसेंबर २०२६ पर्यंत ही मेट्रो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे.

मुंबई मेट्रो लाईन ७अ मुळे ऑफिसला जाणाऱ्यांसाठी प्रवास कसा सोपा होईल?

रस्त्यावरील गर्दीच्या वेळी अंधेरी पूर्व/मीरा-भाईंदर/रेड लाईन कॅचमेंट ते विमानतळ प्रवास 60 मिनिटांनी कमी करेल.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेद्वारे जाण्यासाठी टॅक्सी आणि बसेसवर अवलंबून राहणं कमी होणार.

मीरा भाईंदर आणि उत्तरेकडील उपनगरांपासून विमानतळापर्यंतचा प्रवास विनाअडथळा पूर्ण होणार

अंधेरी कॉरिडॉर आणि मेट्रो लाईन ७/९ वरून ऑफिसला जाणाऱ्यांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवणार.

Mumbai Metro7A
Vande Bharat: आनंदाची बातमी! एक नाही तर तीन वंदे भारत ट्रेन लाँन्च होणार; जाणून घ्या तारीख,मार्ग अन् थांबे

तिकीट कसे मिळवाल?

फक्त अधिकृत बूथ/अ‍ॅप्सवरच कार्ड टॉप अप करा

टॅप करण्यापूर्वी अंदाजे प्रवास अंतर जाणून घ्या

शेवटच्या सेवा रात्री १० वाजेपर्यंत.

उपलब्ध असल्यास महिला कोच वापरा आणि आपत्कालीन मदत बिंदू लक्षात ठेवा.

Mumbai Metro7A
एका Aadhaar Card वर किती मोबाईल SIM कार्ड खरेदी करता येतात? काय आहे नियम

कसं असेल वेळापत्रक?

दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व (गुंडावली) मार्गे लाईन ७: सध्याच्या लाईन ७ प्रवास १६.४ किमी अंतरचा प्रवासचा वेळ ३५-३८ मिनिटे लागतो. अंधेरी पूर्व (गुंडावली)-सीएसएमआयए (टी२ विमानतळ स्टेशन) लाईन७ए विस्ताराद्वारे ३.४ किमी लांबीच्या या विस्तारात अंधेरी पूर्व ते विमानतळापर्यंत जाणारा एक भूमिगत भाग समाविष्ट आहे. या टप्प्याला सुमारे ८-१० मिनिटे लागतील असा अंदाज आहे. त्यामुळे जर ही मेट्रो लाईन सुरू झाली तर ४३-४८ मिनिटात दहिसर ते आंतरराष्ट्रीय विमानतळपर्यंताचा प्रवास होईल.

मुंबई मेट्रो ७अ: खर्च आणि करार -

अंदाजे खर्च: ७अ साठी १,९९८ कोटी रुपये आहे, यात व्हायाडक्ट, ट्रक, दोन स्टेशन, बोगदे आदी उभारण्यात येणार आहेत.

पूर्ण रेड लाईन पॅकेजचा खर्च (लाईन्स७ +७अ +९) अंदाजे ६,६०७-६,६०७ कोटी रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com