PUNE FIITJEE Centre Saam Tv
मुंबई/पुणे

PUNE FIITJEE Centre: फिटजी स्कॅम! अडीच लाख रुपये फी, क्लासेसला ठोकलं टाळं; ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक

Pune FIITJEE Class Scam: पुण्यामध्ये फिटजी क्लासेसचा स्कॅम बाहेर आला आहे. अडीच लाख रुपये फी घेणाऱ्या हा फिटजी क्लासेस जुलै २०२४ पासून बंद झाला. पुणे शहरातील स्वारगेट परिसरात हा क्लासेस आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

देशातील इतर शहरांबरोबर पुण्यात सुद्धा फिटजीचा स्कॅम समोर आला आहे. पुणे शहरातील फिटजी कोचिंग क्लास बंद झाला आहे. या क्लासेसमध्ये प्रत्येक वर्षासाठी २.५ लाख रुपये फी घेतली जाते. पुण्यात तब्बल ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. जुलै २०२४ पासून पुण्यातील क्लास बंद झालाय. त्यामुळे जीईईची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२४ पासून पुणे शहरातील स्वारगेट परिसरात असणारा फिटजी कोचिंग क्लास बंद झाला. पुणे शहराच्या पाठोपाठ पिंपरी चिंचवड येथील फिटजी क्लास सेंटर देखील बंद होणार आहे. या कोचिंगमध्ये जीईईची तयारी करण्यासाठी ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. प्रत्येक वर्षासाठी २.५ लाख रुपये इतकी फी विद्यार्थ्यांनी भरली होती.

फिटजी कोचिंग क्लासेसद्वारे पुण्यात तब्बल ३०० जणांची फसवणूक करण्यात आली आहे. जुलै २०२४ पासून पुण्यातील क्लास बंद झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत आले आहेत. जुलै महिन्यात पालकांनी तत्कालीन पुणे जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. स्पर्धा परीक्षा तसेच आय आय टीमध्ये प्रवेश देण्यासाठी स्वारगेट येथील क्लासमध्ये शेकडो विद्यार्थी येत होते. २०२४ जुलैपासून क्लासचे शटर बंद असून बाहेर जाहिरातीच्या बोर्डवर धुळीचे साम्राज्य साचले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, ठाण्यात देखील एका कोचिंग क्लासेसने विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. ठाणे शहरातील बाजारपेठ परिसरात एका मॉलच्या ठिकाणी हा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खासगी क्लास सुरु करण्यात आलेला होता. संबधित क्लासने जवळपास ८० हून अधिक पालकांकडून ३ कोटी २० लाख इतकी फी आकारली आहे. या क्लासमधील शिक्षण अचानक थांबल्याने मुलांच्या शिक्षणासाठी नवीन क्लाससाठी पैशाची उभारणी करताना पालकांना प्रचंड ओढाताण सहन करावी आहे. याप्रकरणी क्लासेसच्या संचालकांसह अनेकांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT