Pune GoodLuck Cafe Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: हॉटेलमध्ये गेला, चहा अन् बन-मस्का मागवला, पहिल्याच घासात काचेचा तुकडा, पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेतील प्रकार | VIDEO

Pune GoodLuck Cafe Glass Piece Found In Bun: पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा सापडला आहे.

Siddhi Hande

गुडलक कॅफे पुण्यातील खवय्यांसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण या कॅफेमध्ये येतात. पुण्यातील या प्रसिद्ध कॅफेमध्ये इराणी चहा आणि बन मस्का हा खूप प्रसिद्ध आहे. हा बन मस्का खाण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रांग लागलेली असते. मात्र याच गुडलक कॅफेच्या बन मस्कामध्ये चक्क काचेचा तुकडा आढळून आला.

बन मस्कामध्ये काचेचा तुकडा

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या ग्राहकासोबत हा प्रकार घडला त्याने देखील या व्हिडिओच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये दिसून आलेल्या नुसार, एका ग्राहकाने गुडलक कॅफेमध्ये चहा आणि बन मस्का मागवला होता. या पदार्थाचा आस्वाद घेत असताना त्यांना चक्क या बन मध्ये काचेचा तुकडा आढळून आला.

याबाबत आता गुडलक कॅफेच्या व्यवस्थापनाकडून घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हा प्रकार कसा घडला याबद्दल सीसीटीव्हीची पडताळणी सुरू असल्याची माहिती कॅफेच्या व्यवस्थापनाने माध्यमांना दिली.परंतु या घटनेमुळे ग्राहकांना आता बन मस्का खायचा की नाही असा प्रश्न पडलेला आहे.

कॅफे गुडलक हे खूप प्रसिद्ध आहे. दररोज कितीतरी जण इथे फक्त चहा आणि बन मस्का खाण्यासाठी अनेकजण येतात. परंतु अचानक बन मस्तकामध्ये काचेचा तुकडा निघाल्याने आता ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर चुकून हा काचेचा तुकडा ग्राहकाने न बघता खालला असता तर त्याच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे नेहमी कोणताही पदार्थ खाताना काळजी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalgad fort : पावसात ट्रेकिंगचा लुटा मनमुराद आनंद, 'मंगळगड' ची एकदा सफर कराच

PAN Card Security : पॅन कार्डचा गैरवापर कसा ओळखाल? आर्थिक फसवणुकीपासून वाचण्याचे सोपे उपाय

Maharashtra Live Update: जालन्यातील परतुर तालुक्यातील वाहेगाव श्रीष्टी परिसरात ढगफुटी

Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं; VIDEO

SCROLL FOR NEXT