Siddhi Hande
सध्या चीज केकचा ट्रेंड सुरु आहे. सोशल मीडियावर चीजकेक बनवण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.
तुम्ही घरच्या घरी फक्त मोजक्याच सामानात चीजकेक बनवू शकतात.
चीजकेक बनवण्यासाठी सर्वात आधी बिस्कीट मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. त्यात वितळलेले लोणी मिक्स करा.
यानंतर एका डब्ब्यात हे मिश्रण पसरवून १०-१५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
यानंतर एका भांड्यात चीज क्रिम घ्या. त्यात पिठी साखर, लिंबाचा रस टाका. त्यात तुम्ही व्हॅनिला इसेन्सदेखील टाकू शकतात.
यानंतर हे मिश्रण छान फेटून घ्या. त्यात फ्रेश क्रिम मिक्स करा.
यानंतर बेसवर चीज पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळे किंवा टॉपिंग्स टाकून शकतात.
हे मिश्रण ४-५ तास फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर हा केक तुम्ही खाऊ शकतात.