Dhanshri Shintre
अक्रोड हा पोषणतत्त्वांनी भरलेला सुकामेवा असून त्यात हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात.
अक्रोडमध्ये भरपूर प्रथिने, फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि हेल्दी फॅट असून तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
अक्रोड पावडर, काजू बारीक पावडर, दूध, मिल्क पावडर, साखर, तूप.
तुप गरम करून त्यात अक्रोड पावडर आणि काजू हलके परतून सुगंध येईपर्यंत परतवून घ्यावेत.
दुधात मिल्क पावडर मिसळून एकजीव करावे, मग ते मिश्रण कढईत टाकून चांगले परतून घ्यावे.
परतल्यानंतर त्यात साखर घालून चांगले हलवत राहावे आणि पाच मिनिटांनी गॅस बंद करून उतरवावे.
अक्रोड हलवा तयार आहे, वर सुकामेवा घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करून आनंद घ्या.