Pune 10th Board Exam Copy Case News Saam tv
मुंबई/पुणे

Pune : गुरुजीचं बनले कॉपी मास्टर! 100 टक्के निकालासाठी विद्यार्थ्यांना पुरवल्या कॉपी

Pune 10th Board Exam Copy Case News : पुण्यातील धायरी परीक्षा केंद्रात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 100 टक्के निकालाच्या हव्यासापोटी झालेल्या या प्रकारावर बोर्डाने कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Alisha Khedekar

  • धायरी परीक्षा केंद्रात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा आरोप

  • 100% निकालाच्या हव्यासापोटी शिक्षण व्यवस्थेची प्रतिमा मलिन

  • बोर्डाकडून चौकशी व कारवाईचे निर्देश जारी

सुप्रीम मस्कर, पुणे

दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट. पण पुण्यातील धायरीत शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना कॉपी पुरवून शिक्षण व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगलेत. शाळेचा निकाल 100 टक्के लागावा म्हणून धायरीत 'कॉपी बहाद्दर' शिक्षकांनी नेमके काय कारनामे केले जाणून घ्या.

आठवड्याभरापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्येही शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना क़ॉपी पुरवल्याचा प्रकार घडला होता. मात्र यावेळी परिक्षा केंद्रावरील पर्यावेक्षकांलाच चिरीमिरी देत चहापानाला पाठवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी क़ॉपीचं पान मांडून ठेवलंय. त्यामुळे याप्रकरणात शिक्षकावर कारवाई करण्याचे निर्देश बोर्डाच्या विभागीय अध्यक्षांनी दिलेत.

गेल्या काही वर्षांपासून परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून विभागीय आणि राज्य मंडळ प्रयत्नशील आहे. कॉपी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही लावलेले असले तरीही परीक्षार्थी, शाळेच्या केंद्रावरील केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनाच धाक उरलेला नसल्याचं दिसतयं.आता तर विदयार्थी नव्हे तर शिक्षकचं कॉपी बहाद्दर बनत चालले आहेत.

क़ॉपीच्या प्रकरणामुळे दरवर्षी विद्यार्थी आणि शिक्षकांवर कारवाई होत असली, कारवाईचे निर्देश दिले जात असले तरी कॉपीची प्रकरण थांबवण्याचं नाव नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच कॉपी पुरवणाऱ्या शिक्षकांना थेट बडतर्फ करायला हवं. तरच शिक्षण व्यवस्थेला लागलेली कॉपीची वाळवी दूर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT