Pune Duand News x
मुंबई/पुणे

Pune Duand : आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवलं; दौंडमध्ये भयकंर घडलं

Daund Crime : पुण्यातील दौंड परिसरात तरुणाने आईशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून कोयत्याने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

Yash Shirke

Pune Duand Crime : पुण्यातील दौंड परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. तरुणाने आईशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. संशयावरुन रागाच्या भरात आरोपी तरुणाने प्राणघातक हल्ला करुन त्या व्यक्तीची हत्या केली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल १४ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा-बाराच्या सुमारास ही घटना घडली. विशाल उर्फ नान्या थोरात (रा. इंदिरानगर, दौंड) या तरुणाने प्रवीण पवार यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पवार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आरोपीला त्याच्या आईचे आणि प्रवीण पवार यांचे अनैतिक संबंध सुरु असल्याचा संशय होता. संशय वाढत गेल्याने त्याने पवार यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. प्रवीण थोरात यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करण्यात आले. प्रवीण पवार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर भाजी विक्रेता नितीन गुप्ते यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

कोयत्याने वार करुन हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल उर्फ नान्या थोरातला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ (नवीन फौजदारी संहितेनुसार खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये बँक घोटाळ्याविरोधात मेथे दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT