Pune Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला, पुण्यात नेमकं काय घडलं?

Youth Died After Koyta Attacked: वाढदिवशी मारहाण केल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

पुण्यामध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या गुलटेकडी परिसरामध्ये मधयरात्री ही घटना घडली. सुनील सरोदे असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुनील भांडण सोडवण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे या सख्ख्या भावांनी हत्या केली. सुनीलची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सरोदे, रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे हे तिघे ही मित्र आहेत. ७ जुलै रोजी आरोपी रोहनचा वाढदिवस होता. त्यावेळी सुनील सरोदेने त्याला मारहाण केली होती. याचा राग रोहन आणि शिवशरण कांबळे या सख्ख्या भावांच्या मनामध्ये होता. यावरूनच या दोघांनी सुनीलचा काटा काढण्याचे ठरवले.

मंगळवारी रात्री रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे हे दोघेही सुनील सरोदेच्या घरी गेले. त्यांनी सुनील सरोदेचा भाऊ गणेशला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी सुनील त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेला. रोहन आणि शिवशरण यांच्या मनामध्ये सुनीलविषयी आधीच राग होता. त्यांनी सोबत आणलेला कोयता काढून सुनीलच्या गळ्यावर वार केला.

या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुनील सरोदे याला तात्काळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. रोहन कांबळे, शिवशरण कांबळे हे दोघेही गुन्हेगारीवृत्तीतचे आहेत. ते नुकताच जामीनावर जेलबाहेर आले होते. सुनील सरोदेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी या दोघांना अटक केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India's Got Talentच्या मंचावर शहनाज गिलला आली सिद्धार्थ शुक्लाची आठवण, रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Breakfast Tips: कमी वेळ अन् हेल्दी नाश्ता; सकाळच्या घाईगडबडीत बनवा 'हे' पदार्थ, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाकडून भाजपच्या आमदाराच्या हत्येची सुपारी; अंबादास दानवेंनी फोडला बॉम्ब

Flight Rules: गुड न्यूज! DGCA ने तिकिटासंदर्भात आणले नवीन नियम, विमान प्रवाशांना होणार मोठा फायदा; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT