Kidney Stone : खरंच बीअर प्यायल्यानं मुतखडा निघून जातो? तज्ज्ञ डॉक्टरांनी गैरसमजच केला दूर

Kidney Stone, Health Tips : भारतामध्ये अनेकांना मुतखड्याचा त्रास होतो. त्यावर अनेकजण बीअर प्यायचा सल्ला देतात. तुम्ही देखील अशा लोकांपैकी आहात का ज्यांना वाटते की बीअर प्यायल्याने किडनी स्टोन निघतो.
Kidney Stone, Health Tips
Kidney Stone, Health Tips
Published On

Kidney Stone : भारतामध्ये अनेकांना मुतखड्याचा त्रास होतो. त्यावर अनेकजण बीअर प्यायचा सल्ला देतात. तुम्ही देखील अशा लोकांपैकी आहात का ज्यांना वाटते की बीअर प्यायल्याने किडनीस्टोन (Kidney Stone, Health Tips) निघतो. तर तुमचा हा गोड गैरसमज दूर करा, कारण असे काहीही घडत नाही, हा निव्वळ भ्रम आहे. याबाबत आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांनी बीअर प्यायल्याने मुतखडा निघतो, ही भावना धांधात चुकीची असल्याचे स्पष्ट सांगितले.

कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक अॅसिड यांसारख्या पदार्थांचे प्रमाण शरीरात वाढल्यामुळे किडनीस्टोन तयार होतात. ही गंभीर आणि वेदनादायक आरोग्य समस्या आहे, ज्यापासून भारतातील बरेच लोक ग्रस्त आहेत. एखाद्याला मुतखडा झाल्याचे समजताच त्याला बीअर पिण्याचा सल्ला (Can drinking beer cause kidney stones?) दिला जातो, पण हे पूर्णपणे चुकीचं असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातील डॉ. अमित नागरिक (नेफ्रोलॉजी, अपोले हॉस्पिटल, नवी मुंबई) यांच्यासोबत आम्ही याबाबत चर्चा केली. त्यांनी हा लोकांचा गोड गैरसमज असल्याचे सांगितले.

Kidney Stone, Health Tips
Kidney Stones Problem: पोटात वारंवार दुखतंय? तुम्हाला मुतखडा झालायं असे वाटतंय का? जाणून घ्या त्याची लक्षणे

बीअर प्यायल्याने खरेच मुतखडा निघून जातो? नेमकं सत्य काय... Can drinking beer cause kidney stones?

बीअर प्यायल्याने किडनी स्टोन (मुतखडा) निघून जातो, ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. अतिप्रमाणात बीअर प्यायल्याने लघवीचे प्रमाण वाढून शरीरातील पाण्याचे प्रमाण (Dehydration Risk) कमी होतं. त्यामुळे स्टोन वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे बीअर प्यायल्याने मुतखडा जातो, ही चुकीची भावना असल्याचे डॉ. अमित नागरिक यांनी सांगितलं.

अतिप्रमाणात बीअर प्यायल्याने कोणत्या समस्या होतील -

मुतखडा झालाय, तो पाडण्यासाठी तुम्ही वारंवार किंवा अतिप्रमाणात बीअर पीत असाल तर तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार, जर वारंवार मद्यपान अथवा अतिप्रमाणात बीअर सेवन केल्यास किडनी खराब होणे, किडनी निकामी होणे, रक्तदाब, कर्करोग, कमकुवत प्रतिकारशक्ती यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे किडनीस्टोन काढण्यासाठी अतिप्रमाणात बीअरचं सेवन करणं टाळा. डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरु नका.

Kidney Stone, Health Tips
मुतखडा नैसर्गिकरित्या वितळवण्यासाठी हे घरगुती उपाय करुन पहा

घरगुती उपाय काय ?

शरीरात जेव्हा किडनी स्टोन तयार होऊ लागतो तेव्हा मूत्राशयातील मार्गात अडथळा निर्माण होतो आणि परिणामी लघवी करण्यास जळजळ, आग होणे आणि प्रचंड वेदना अशी अनेक लक्षणे जाणवतात. या आजारावर अनेक उपाय सांगितले जातात. मुतखडा होऊ नये म्हणून काही घरगुती उपायही आहेत. याबाबत डॉ. अमित नागरिक सांगतात की, "किडनी स्टोनसाठी घरगुती उपाय आहेत. मीठाचे प्रमाण कमी करणे, पाणी जास्तीत जास्त प्रमाणा प्यावे. कमीत कमी तीन ते चार लीटर पाणी प्यावे. वजन जास्त असेल तर कमी करावे. लाल मांस खाऊ नये. जेणेकरुन युरिक अॅसिड वाढणार नाही. त्यामुळे मुतखडा होणार नाही."

किडनी स्टोन कायमचा जाण्यासाठी काय करावे -

पाणी जास्तीत जास्त प्यावे. मीठाचे प्रमाण कमी करावे. जास्त खारट जेवण खाऊ नये. प्रोसेस फूड कमी घ्यायचे. हेल्दी लाईफस्टाईल जगावी. तसेच नॉनव्हेजचे प्रमाण कमी करावे, त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता कमी होते.

Kidney Stone, Health Tips
Kidney Stones मुळे वैतागले आहात? या ५ पदार्थांचा आहारात करा समावेश, होईल फायदा

औषधाने मुतखडा काढता येतो का?

किडनी स्टोन वेगवेगळ्या साईजचे असतात. पण ज्याची साईज पाच मिलीमीटरपेक्षा कमी आहे, त्यांना औषधाने काढू शकतो. पण जे किडनीस्टोन ८ मिलीमीटरपेक्षा जास्त आहेत, ते औषधांनी निघत नाहीत. प्रयत्न केला जातो, पण शस्त्रक्रिया करावी लागते. छोटे खडे औषधाने निघू शकतात, असे डॉ. अमित नागरिक यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com